मामासोबतची ओली पार्टी ऐन रंगात आली अन् तितक्यात… उसन्या पैशाच्या वादातून रक्ताचा सडा; कल्याण हादरलं

कल्याण पूर्व येथे पैशांच्या वादातून एका २५ वर्षांच्या तरूणाला बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली होती. 20 ते 25 वयोगटातील तरूणांच्या सशस्त्र टोळक्याने लाकडी फळी, झाडू आणि दगडांचा वापर करून त्या तरूणाला बेदम चोपलं, त्यात गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मामासोबतची ओली पार्टी ऐन रंगात आली अन् तितक्यात... उसन्या पैशाच्या वादातून रक्ताचा सडा; कल्याण हादरलं
उसन्या पैशाच्या वादातून रक्ताचा सडा; कल्याण हादरले
Follow us
| Updated on: Apr 04, 2024 | 12:51 PM

कल्याण पूर्व येथे पैशांच्या वादातून एका २५ वर्षांच्या तरूणाला बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली होती. 20 ते 25 वयोगटातील तरूणांच्या सशस्त्र टोळक्याने लाकडी फळी, झाडू आणि दगडांचा वापर करून त्या तरूणाला बेदम चोपलं, त्यात गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे अख्खं कल्याण हादरलं होतं. मात्र या हत्येनंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आता सापळा रचत याप्रकरणातील तीन आरोपींना बेड्या ठोकत त्यांच्या मुसक्या आवळल्या. सूरज सोमा हिलम (वय 25) असे मृत तरूणाचे नाव होते. तर रूपेश महादेव कांबळे आणि मोहन रमेश बनसोडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून यात एका अल्पवयीन तरूणाचाही समावेश आहे. उर्वरित हल्लेखोरांचा पोलिसांककडून कसोशीने शोध घेण्यात येत आहे.

मामासोबतची ओली पार्टी करत होता अन्

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरूण सूरज हा मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा त्याच्या मामासह दारू प्यायला बसला होता. त्यांची ओली पार्टी रंगात आली असतानाच अचानक तेथे 20 ते 25 वयोगटातील तरूणांचे टोळके आले. उसने घेतलेल्या पैशांच्या देण्या-घेण्यावरून मारहाण केल्याचा राग मनात धरून रूपेश कांबळे आणि मोहन बनसोडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या टोळक्याने सूरज याच्यावर हल्ला चढवला. त्या तरूणांनी सूरजला लाकडी फळी आणि झाडूसह मारहाण केली, एवढंच नव्हे तर त्याच्यावर दगडांचा माराही केला. या घटनेत गंभीर जखमी झालेला सूरज हा रक्ताच्या थारोळ्यात तडफडत ठार झाला. हे पाहून हल्लेखोरांच्या टोळक्याने तेथून पळ काढला.

24 तासांत आरोपींना ठोकल्या बेड्या

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि पोस्टमॉर्टमसाठी सूरजचा मृतदेह केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठवला. या हत्येसंदर्भात मृत सूरज याचा भाऊ पिंट्या याने कोळसेवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी भादंवि कलम 302, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा कोळसेवाडी पोलिसांसह क्राईम ब्रँचचे कल्याण युनिटही समांतर तपास करत होते. अखेर क्राईम ब्रँचच्या हाती महत्वाचे धागे-दोरे लागले.

क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार, सपोनि संदिप चव्हाण, हवा. दत्ताराम भोसले, अनुप कामत, किशोर पाटील, दिपक महाजन, गुरूनाथ जरग, सचिन वानखेडे, मिथून राठोड, विनोद चन्ने, गोरक्ष शेकडे, रविंद्र लांडगे, अमोल बोरकर हे पथक खुन्यांच्या मागावर होते. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजवरून या पथकाने मारेकरी तरूणांचा माग काढला. सूचक नाका रिक्षा स्टँडवर सापळा लावून या पथकाने रूपेश कांबळे, मोहन बनसोडे आणि एका अल्पवयीन तरूणाला ताब्यात घेतले. कसून केलेल्या चौकशी दरम्यान या तिघांसह अन्य काही तरुणांनी मिळून सूरज हिलम याच्यावर सशस्त्र हल्ला चढवून त्याला यमसदनी धाडल्याची कबुली दिली. या हत्याकांडातील अन्य हल्लेखोर भूमिगत झाले असून पोलिस त्यांचाही कसोशीने शोध घेत आहेत.

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.