AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठ हजारांचं लाईटबिल थकलं, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज कापली, अस्वस्थ झालेल्या तरुणाची आत्महत्या

इचलकरंजीत मन सुन्न करणारी घटना घडली आहे. शहरातील गणेशनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या विशाल नावाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आठ हजारांचं लाईटबिल थकलं, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज कापली, अस्वस्थ झालेल्या तरुणाची आत्महत्या
आठ हजारांचं लाईटबिल थकलं, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज कापली, अस्वस्थ झालेल्या तरुणाची आत्महत्या
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jul 17, 2021 | 2:52 PM
Share

कोल्हापूर : इचलकरंजीत मन सुन्न करणारी घटना घडली आहे. शहरातील गणेशनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या विशाल नावाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशालच्या घराचं गेल्या काही दिवसांचं वीजबिल थकलं होतं. या थकबाकीची एकूण किंमत 8 हजार 200 रुपये इतकी होती. त्यामुळे महावितरणाचे कर्मचारी त्याच्या घरी आले. त्यांनी विशालच्या घराची वीज कापली. यावेळी विशालने महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना खूप विनवण्या केल्या. पण त्यांनी ऐकलं नाही आणि वीज कापली. त्यामुळे विशाल खूप अस्वस्थ झाला. अखेर त्याने आत्महत्या करुन स्वत:चं आयुष्य संपवलं.

घरची परिस्थिती बेताची, यंत्रमाग कामगार म्हणून काम

विशाल गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या परिवसारासह शहरात वास्तव्यास होता. तो यंत्रमाग कामगार म्हणून काम करायचा. लॉकडाऊन काळात विशालच्या हातात काम नव्हते. विशालची घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तो मिळेल ते काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. तो गेल्या दोन वर्षांपासून मोलमजुरी करून कसंबसं आपल्या परिवाराचे पोट भरायचा.

विनंती केल्यानंतरही वीज कापली

विशालच्या घराचं गेल्या काही महिन्यांपासूनचं वीजबिल थकलं होतं. त्याच्या घराची 8200 रुपयांची थकबाकी झाली होती. त्याला वीजबिल भरण्यास सध्या अडथळा येत होता. पण आज सकाळी गणेश नगर परिसरातील त्याच्या घरातील वीज कनेक्शन कट करण्यासाठी महावितरणाचे कर्मचारी गेले होते. विशालने महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना वीज न कापण्याची विनंती केली. पण त्यांनी विशालला न जुमानता घराची वीज कापली. त्यामुळे विशाल अस्वस्थ आणि नाराज झाला.

विशालची आत्महत्या

विशालने दुपारी जेवण करून आपल्या राहत्या घरी असणाऱ्या एका खोलीमध्ये आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर त्याच्या खोलीत घरातील एक सदस्य आलं. त्यानंतर एकच खळबळ उडाली. विशालच्या आई-वडील, पत्नीने टाहो फोडला. त्यांच्या आक्रोशाच्या आवाजाने आजूबाजूचे नागरिक घरात आले. घटनेची माहिती मिळताच शेजारच्यांनाही धक्का बसला. अखेर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विशालच्या कुटुंबियांचे गंभीर आरोप

विशालच्या कुटुंबियांनी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना विशालने विनवण्या केल्या. मात्र, तरीही त्यांनी वीज कापली. याबद्दल विशालला खूप राग आला आणि तो नैराश्यात गेला. त्यातूनच त्याने आत्महत्या केली, असा आरोप विशालच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.

हेही वाचा : 

मालकाच्या मुलीवर कामगाराचा जीव जडला, मालक चिडला, दुहेरी हत्याकांडाने चाकण हादरलं

बाय बाय, व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून 25 वर्षीय तरुण व्यापाऱ्याचा गळफास

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...