पाठलाग आणि रेकी…रात्रभर चौकशी, झिशान सिद्दीकी यांचा पाठलाग करणाऱ्यांना का सोडलं? मोठं कारण समोर
झिशान सिद्दीकी यांचा पाठलाग करणाऱ्या दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चार दिवसांपासून सुरू असलेल्या या पाठलागाने खळबळ उडाली होती. पोलिसांनी त्यांची चौकशी केली, पण कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने त्यांना सोडण्यात आले. हे प्रकरण बाबा सिद्दीकी हत्येनंतर झिशान सिद्दीकींच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण करते. पोलिसांनी पुन्हा एकदा सुरक्षेचा आढावा घेण्याची गरज आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी यांचा पाठलाग करून त्यांची रेकी केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजली होती. गेल्या चार दिवसांपासून 2 व्यक्ती या झिशान सिद्दीकींचा पाठलाग करत त्यांची रेकी करत होते अशी माहिती समोर आली होती. याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी सिद्दीकींचा पाठलाग करणाऱ्या दोघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरु केली. कार्यकर्त्यांना संशय आल्यानंतर या दोघांना ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली. मात्र नंतर पाठलाग करणाऱ्या या दोघांना सोडून देण्यात आल्याचं उघड झालं आहे.
झिशान सिद्दीकी यांचे वडील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची गेल्या वर्षी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतरच झिशान सिद्दीकींची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. मात्र काल झिशान सिद्दीकी यांना फॉल करण्यात येत असल्याची तसेच त्यांची रेकी होत असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ माजली. अखेर निर्मल नगर पोलिसांनी पाठलाग करणाऱ्यांना ताब्यात घेतलं व काल रात्री उशीरापर्यंत निर्ममल नगर पोलिस तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी सुरू केली. पण चौकशीमध्ये संशयास्पद असं ठोस कारण आढळलं नाही.
चार दिवसांपासून सुरू होती रेकी
मिळालेल्या माहितीनुसार, या दोन अनोळखी व्यक्ती झिशान यांचा पाठलाग करत रेकी करत होते. काल दिवसभर ते चार चाकी वाहनाने पाठलाग करत होते. खेरवाडी या परिसरात झिशान सिद्दिकी यांचं ऑफिस आहे. आणि या ऑफिसच्या आवारातच ते दोघं असताना कार्यकर्त्यांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी दोघांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. तेथे काल रात्री उशीरापर्यंत त्यांची कसून चौकशी करण्यात आली. तसेच संशय असलेली गाडीदेखील पोलिसांनी जप्त केली. मात्र त्या दोन्ही तरूणांच्या चौकशीत काहीच संशयास्पद आढळलं नाही.
कोण होते ते तरूण ?
हे दोन्ही तरूण सोलपूरच्या ग्रामीण भागातून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना आर्थिक फटका बसला होता, त्यामुळे मदतीसाठी ते झिशान सिद्दीकी यांना भेटण्याचा प्रयत्न करत होते, मात्र सिद्दीकी यांच्याशी त्यांची भेट होत नव्हती. अखेर त्यांची भेट व्हावी यासाठी ते दोघे तरूण सिद्दीकी यांच्या कार्यालयाच्या बाहेर 3 ते 4 तास उभे होते, त्यांच्या भेटीसाठी प्रयत्नशील होते. मात्र तेव्हाच सिद्दीकी यांच्या कार्यकर्त्यांना त्या दोघांचा संशय आला म्हणून त्यांनी दोघांनाही पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यांच्या चौकशीत पोलिसांना ठोस असं काहीच आढळलं नाही त्यामुळे रात्री उशीरापर्यंत चौकशी केल्यानंतर त्या दोन्ही तरूणांना सोडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर झिशान यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. या हत्येच्या चौकशी आणि तपासादरम्यानच झिशान यांच्या जीवालाही धोका असल्याचे उघड झाले होते, त्यामुळे मुंबई पोलिसांनी बंदोबस्त वाढवला तसेच झिशान सिद्दीकींच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती. त्यांच्यासंदर्भात
