बलात्काराचा प्लॅन फसला, आमदाराच्या भाचीची बॉयफ्रेण्डसह हत्या

बिहारमधील मुंगेरचे राजदचे आमदार विजय कुमार यांची भाची रिया हिची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती, तर तिचा बॉयफ्रेण्ड आसिफचाही मृतदेह आढळला होता.

बलात्काराचा प्लॅन फसला, आमदाराच्या भाचीची बॉयफ्रेण्डसह हत्या

पाटणा : बलात्काराचा प्रयत्न फसल्यामुळे बिहारमध्ये राजद आमदाराच्या भाचीची तिच्या बॉयफ्रेण्डसह हत्या (Bihar Double Murder solve) करण्यात आली आहे. अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी या हायप्रोफाईल दुहेरी हत्याकाडांचा तपास लावला. तरुण आणि तरुणीच्या हत्येप्रकरणी आरोपी दानिशला अटक करण्यात आली आहे.

बिहारमधील मुंगेरचे राजदचे आमदार विजय कुमार यांची भाची रिया हिची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती, तर तिचा बॉयफ्रेण्ड आसिफचाही मृतदेह आढळला होता. प्रेमप्रकरणातून रियाची हत्या करुन आसिफने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता. मात्र एकामागून एक धक्कादायक प्रकार समोर आले आणि डबल मर्डरचं सत्य बाहेर आलं. रिया आणि तिचा बॉयफ्रेंड आसिफची त्याच्याच मित्रांनी गोळी झाडून हत्या केली.

गोळीबाराच्या पद्धतीवरुन हे प्रकरण हत्या करुन आत्महत्या झाल्याचं वाटत होतं. मात्र चौकशीदरम्यान आरोपी दानिशने मित्रांच्या साथीने दोघांची हत्या (Bihar Double Murder solve) केल्याची कबुली दिली.

मयत तरुण आसिफ आणि तरुणी रिया यांचं दोन-तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण होतं. तीन-चार दिवसांपूर्वी आसिफने तिला पिस्तुल मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. रियाला पिस्तुल चालवायला शिकायचं होतं. गर्लफ्रेण्ड नाराज होऊ नये, म्हणून आसिफने रियाचा हट्ट पुरवायचा निर्णय घेतला.

मुंबईतील प्रसिद्ध ‘मयांक ट्युटोरियल्स’च्या मालकाची हत्या, भरवर्गात विद्यार्थ्यांसमोर सुरीने भोसकलं

हत्येच्या रात्री आरोपी दानिशसोबत त्याचे आणखी दोन मित्रही हजर होते. पिस्तुल मिळवून देण्याच्या बहाण्याने दानिशने आसिफ आणि रियाला बोलावून घेतलं. दानिशला रिया आवडत असल्यामुळे त्याचा रियावर रेप करण्याचा प्लॅन होता.

आसिफने विरोध करुन रियाला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दानिश आणि त्याच्या मित्रांनी मिळून आसिफ आणि रियावर गोळीबार केला. गोळीबारात दोघांचही मृत्यू झाला. सकाळच्या सुमारास त्यांचे मृतदेह पोलिसांना सापडले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *