मुंबईतील प्रसिद्ध 'मयांक ट्युटोरियल्स'च्या मालकाची हत्या, भरवर्गात विद्यार्थ्यांसमोर सुरीने भोसकलं

मुंबईतील प्रसिद्ध 'मयांक ट्युटोरियल्स'चे मालक मयांक मांडोत यांची त्यांच्याच संस्थेत पूर्वी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने भरवर्गात हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

मुंबईतील प्रसिद्ध 'मयांक ट्युटोरियल्स'च्या मालकाची हत्या, भरवर्गात विद्यार्थ्यांसमोर सुरीने भोसकलं

मुंबई : मुंबईतील गोवंडीत अल्पवयीन विद्यार्थ्याने ट्यूशन टीचरची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच घाटकोपरमध्येही क्लासचालकाची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील प्रसिद्ध ‘मयांक ट्युटोरियल्स’चे मालक मयांक मांडोत (Mayank Tutorials Owner Murder) यांची गणेश पवार नावाच्या कर्मचाऱ्याने हत्या केली. कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून त्याने भरवर्गात सर्व विद्यार्थ्यांसमोर मांडोर यांचा जीव घेतल्याचा आरोप आहे.

घाटकोपर पूर्व भागातील पंत नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रायगड चौकात शिवशक्ती हाईट्स नावाच्या इमारतीत तळमजल्यावर ‘मयांक ट्युटोरियल्स’ ही खासगी शिकवणी घेणारी संस्था आहे. आरोपी गणेश पवार ‘मयांक ट्युटोरिल्स’मध्ये नोकरी करत होता. मात्र काहीच दिवसांपूर्वी मांडोत यांनी पवारला नोकरीवरुन काढून टाकलं होतं.

आरोपी गणेश पवार रविवारी संध्याकाळी याच रागातून चाकू घेऊन क्लासमध्ये आला. शिकवणी सुरु असतानाच भरवर्गात मालक मयांक मांडोत यांच्यासोबत त्याची हमरीतुमरी झाली. त्यानंतर चाकूने सपासप वार करुन पवारने मांडोत यांना भोसकलं. मांडोत यांनी पवारला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र वार वर्मी लागल्याने जागीच त्यांचा मृत्यू (Mayank Tutorials Owner Murder) झाल्याची माहिती आहे. रविवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.

फर्स्ट क्लासमध्ये दरवाजात उभं राहण्यावरुन वाद, तरुणाने सहप्रवाशाचं बोट चावून तोडलं

विशेष म्हणजे हा प्रकार घडला, तेव्हा शिकवणीसाठी काही विद्यार्थीही क्लासमध्ये उपस्थित होते. या प्रकारात एक विद्यार्थिनीही जखमी झाल्याची माहिती आहे. आरोपी गणेश पवारही जखमी झाल्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी गणेशला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे.

मयांक मांडोत आणि गणेश यांच्यामध्ये यापूर्वीही पगारावरुन वाद झाले होते. आपला गेल्या महिन्याचा पगार झाला नसल्याचा दावा गणेशने केला होता.

मयांक ट्यूटोरियल्स मुंबईतील प्रसिद्ध शिकवणी संस्था आहे. मुंबईत त्यांच्या सात शाखा असून चेंबुरमध्ये मुख्यालय आहे.

गेल्या आठवड्यात गोवंडीत एका अल्पवयीन विध्यार्थ्यांने आपल्या ट्यूशन टीचरची हत्या केल्याची घटना घडली होती. अवघ्या काही दिवसांतच पुन्हा एका क्लास चालकाच्या हत्येने खळबळ उडाली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *