AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हैदराबाद गँगरेप आरोपींकडून आधी नऊ महिलांची बलात्कार करुन हत्या?

आरिफ आणि चेन्‍नाकेशवुलु या दोघांनी आणखी काही बलात्कार आणि हत्यांची कबुली दिल्याचा दावा केला जात आहे.

हैदराबाद गँगरेप आरोपींकडून आधी नऊ महिलांची बलात्कार करुन हत्या?
| Updated on: Dec 18, 2019 | 10:30 AM
Share

हैदराबाद : हैदराबादमधील पशुवैद्यक तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिला जिवंत जाळणाऱ्या आरोपींनी याआधी नऊ महिलांची बलात्कार करुन निर्घृण हत्या (Hyderabad suspects behind rape murder) केल्याचं खळबळजनक वृत्त समोर येत आहे. चारपैकी दोघा आरोपींनी नऊ महिलांवर बलात्कार करुन त्यांना जिवंत जाळल्याची कबुली दिली होती, असा दावा पोलिसांनी केला.

सायबराबाद पोलिस सध्या कर्नाटकात तळ ठोकून असून नऊ केसेसची सत्यता पडताळून पाहिली जात आहे. हे कथित बलात्कार कर्नाटक-तेलंगणा सीमेवर झाल्याची माहिती आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पोलिस पुरावे गोळा करत आहेत. सहा डिसेंबरला पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत हैदराबाद गँगरेप आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपी ठार झाले होते.

आरिफ आणि चेन्‍नाकेशवुलु या दोघांनी आणखी काही बलात्कार आणि हत्यांची कबुली दिल्याचा दावा केला जात आहे. तेलंगणाच्या संगारेड्डी, रंगारेड्डी, मेहबूबनगर आणि आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागात हे प्रकार घडल्याची माहिती आहे. यामध्ये शरीरविक्रय करणाऱ्या महिला, तृतीयपंथी यांचाही समावेश आहे.

हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊण्टर करण्यात आला. हैदराबाद पोलिसांच्या तावडीतून आरिफ, शिवा, नवीन आणि चिन्नाकेशवुलू हे चारही आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते जागीच ठार झाले. मात्र ही चकमक खरी आहे की बनावट, यावरुन दोन गट पडले आहेत. (Hyderabad suspects behind rape murder)

कशी झाली चकमक? हैदराबाद पोलिस चारही आरोपींना 5 डिसेंबरच्या मध्यरात्री साडेतीन वाजता घटनास्थळी घेऊन गेले होते. गुन्ह्याच्या पद्धतीची पुनर्निर्मिती करत असताना चौघांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी आरोपींवर गोळ्या झाडल्या. गोळीबारात चौघांचाही जागीच मृत्यू झाला, असं सांगण्यात येत आहे.

ज्या ठिकाणी गुन्हा घडला, तिथून जवळच हैदराबाद-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर ही चकमक घडली. हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर 27 नोव्हेंबरच्या रात्री सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर चौघांनी तिची हत्या करुन मृतदेह पेटवला होता.

काय आहे प्रकरण?

हैदराबादमधील शासकीय रुग्णालयातील पशुवैद्यक तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करुन चौघांनी तिचा मृतदेह पेटवून दिला होता. 28 नोव्हेंबरला सकाळी 26 वर्षीय पीडितेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर 29 तारखेला चारही आरोपींना अटक झाली होती. या घटनेविरोधात अख्ख्या देशभरात संतापाची लाट उसळली होती.

बुधवार 27 नोव्हेंबरला संध्याकाळी डॉक्टर तरुणीला टोल प्लाझाजवळ स्कूटी पार्क करुन जाताना चारही आरोपींनी पाहिलं होतं. त्यावेळी त्यांच्या डोक्यात कट शिजू लागला. त्यांनी तिच्या स्कूटीमधली हवा काढली. रात्री नऊ वाजताच्या सुमारास जेव्हा ती स्कूटी नेण्यासाठी तिथे पुन्हा आली, तेव्हा तिला टायर पंक्चर झाल्याचं लक्षात आलं.

आरोपी मोहम्मद आरिफ तिच्याजवळ मदतीच्या बहाण्याने पोहचला. तर शिवा स्कूटी दुरुस्त करतो, असं सांगून ती दूर घेऊन गेला. त्यानंतर आरिफ, शिवा आणि नवीन तिला बळजबरी एका मोकळ्या जागेवर घेऊन गेले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. स्कूटी दूरवर नेऊन सोडल्यानंतर शिवा परत आला आणि त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

डॉक्टर तरुणीवर बलात्कार करण्यापूर्वी आरोपींनी तिला बळजबरी मद्य पाजलं होतं. तिने मदतीसाठी याचना केली, मात्र नराधमांना पाझर फुटला नाही. किळसवाणी बाब म्हणजे तिने प्राण सोडल्यानंतर तिच्या मृतदेहासोबतही आरोपी बलात्कार करत राहिले.

हत्येनंतर आरोपी तिचा मृतदेह ट्रकवर टाकून निघाले. वाटेत पेट्रोल आणि डिझेल विकत घेतलं. रंगारेड्डी जिल्ह्यातील शादनगरमध्ये एका निर्जनठिकाणी त्यांनी तिचा मृतदेह टाकला. त्यानंतर पेट्रोल ओतून तिचा मृतदेह जाळला. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

Hyderabad suspects behind rape murder

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.