AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी ओळख, मग मोठ्या नफ्याचं आमिष, झांबियातील भारतीयांकडून पुणेकर व्यवसायिकांना तब्बल पावणेदोन कोटींना गंडा

झांबियात व्यवसाय असलेल्या दोन भारतीयांनी पुणेकर व्यावसायिकांना तब्बल पावणेदोन कोटी रुपयांना गंडा घातला आहे (Indian from Zambia fraud with Pune traders).

आधी ओळख, मग मोठ्या नफ्याचं आमिष, झांबियातील भारतीयांकडून पुणेकर व्यवसायिकांना तब्बल पावणेदोन कोटींना गंडा
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 09, 2020 | 8:05 AM
Share

पुणे : ऐन कोरोनाच्या काळात झांबियात व्यवसाय असलेल्या दोन भारतीयांनी पुणे शहरातील व्यावसायिकांना तब्बल पावणेदोन कोटी रुपयांना गंडा घातला आहे (Indian from Zambia fraud with Pune traders). आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित व्यवसायिकांनी याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी पुण्यातील व्यापाऱ्यांकडून आधी शालेय वह्या, पीव्हीसी पाईप, सॅनिटायझर, इलेक्‍ट्रीकल वस्तू आदींची मागणी केली. मात्र, पैसे अदा करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी हात वर केले आणि पोबारा केला.

एजाज रियाज शेरकर (49, रा. भंडारी लॅण्डमार्क, कोंढवा), प्रविण वसंत माटे (शोभा पार्क, कर्वेनगर) अशी आरोपींची नावे आहेत. त्या दोघांचाही झांबियात व्यवसाय आहे. याप्रकरणी विकास मनोहर सावंत (59, रा. मॉडेल कॉलनी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार मनोहर सावंत यांचा इंडवे इंटरनॅशनल नावाचा आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे. ते पत्नीसह भागीदारीमध्ये घरातूनच हा व्यवसाय करतात. त्यांची आरोपी एजाज शेरकर बरोबर 2016 मध्ये ओळख झाली होती. शेरकर याने झांबिया येथे राहण्यास असून भारतातून वेगवेगळ्या मालाची आयात करुन विक्री करत असल्याचे सांगितले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

आरोपीने आपला झांबियात मोठा व्यवसाय असून तक्रारदार सावंत यांच्याकडे भारतातून माल निर्यात करण्याचा प्रस्ताव ठेवला. शेरकर याने सावंत यांच्याशी वारंवार संपर्क करुन त्यांना निर्यातीचा व्यवसाय करण्यास भाग पाडले. मात्र, पैसे घेऊन माल न पाठवता फसवणूक केली. याप्रकारे आरोपींनी विकास सावंत यांच्याबरोबर इतर आठ जणांचीही फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

या तक्रारीनंतर विदेशात व्यवसाय असल्याची बतावणी करुन अनेक व्यवसायिकांना गंडा घालण्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे आता पुणे पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

चंद्रपुरात जुन्या वादातून कोळसा व्यवसायिकाची हत्या, दोन आरोपींना अटक

औरंगाबादेत कोरोनाग्रस्त 90 वर्षीय आजीला जंगलात सोडलं, निर्दयी नातेवाईक पसार, गुन्हा दाखल

विवाहबाह्य संबंधातून पतीची हत्या, नागपुरात महिलेसह बॉयफ्रेंड रंगेहाथ अटक

Indian from Zambia fraud with Pune traders

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...