औरंगाबादेत कोरोनाग्रस्त 90 वर्षीय आजीला जंगलात सोडलं, निर्दयी नातेवाईक पसार, गुन्हा दाखल

औरंगाबादमध्ये एका 90 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह आजीबाईंना त्यांच्या नातेवाईकांनीच जंगलात सोडून दिलं (Corona positive grandmother in forest).

औरंगाबादेत कोरोनाग्रस्त 90 वर्षीय आजीला जंगलात सोडलं, निर्दयी नातेवाईक पसार, गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Aug 08, 2020 | 10:49 AM

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजूबाजूला अनेक बदल होत आहेत. काहींवर बेरोजगारीची वेळ आली आहे, तर अनेकांचे उद्योग ठप्प झाले. मात्र, अशाही स्थितीत नागरिक या आव्हानाचा सामना करत आहेत. दुसरीकडे अशीही उदाहरणं समोर येत आहेत जी माणुसकीच्या नावावर काळिमा फासणारे आहेत. औरंगाबादमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. औरंगाबादमध्ये एका 90 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह आजीबाईंना त्यांच्या नातेवाईकांनीच जंगलात सोडून दिलं (Corona positive grandmother in forest). त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

औरंगाबादमधील कच्चीघाटी परिसरात काही नातेवाईकांनी आपल्या 90 वर्षीय कोरोनाबाधित आजींना थेट जंगलात सोडलं. जर्जर म्हाताऱ्या आजींना जंगलात टाकून संबंधित नातेवाईक फरार आहेत. या आजींना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारानंतर मरणासन्न अवस्थेत जंगलात सोडण्यात आलेल्या आजींची प्रकृती आता स्थिर आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

आजीला जंगलात सोडून पळून गेलेल्या नातेवाईकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लवकरच या नातेवाईकांना अटक होण्याची शक्यता आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

औरंगाबादमधील कोरोनाची स्थिती

औरंगाबाद जिल्ह्यात नव्याने 130 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. सध्या 3 हजार 757 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यासह एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 16 हजार 243 एवढी झाली आहे. त्यापैकी 11 हजार 960 रुग्ण बरे झाले आहेत. यातील 526 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

हेही वाचा :

पुण्यात श्रींची प्रतिष्ठापना कोठे करायची? मंदिरंही बंद असल्याने गणेश मंडळांमध्ये संभ्रम

Kerala Plane Crash Photos: केरळमध्ये विमानाचा थरकाप उडवणारा अपघात, 30 फूट खाडीत कोसळून दोन तुकडे

पुणेकरांसाठी खुशखबर, धरणांमध्ये मुबलक पाणी, खडकवासला धरण 92.61 टक्के भरलं

Corona positive grandmother in forest

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.