AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात श्रींची प्रतिष्ठापना कोठे करायची? मंदिरंही बंद असल्याने गणेश मंडळांमध्ये संभ्रम

पुण्यातील मंदिरं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदच आहेत. त्यामुळे गणेश मंडळांसमोर काहीसं संभ्रमाचे वातावरण आहे (Ganesh Mandal on Pune Ganeshotsav).

पुण्यात श्रींची प्रतिष्ठापना कोठे करायची? मंदिरंही बंद असल्याने गणेश मंडळांमध्ये संभ्रम
| Updated on: Aug 08, 2020 | 9:42 AM
Share

पुणे : यंदाचा गणेशोत्सव केवळ 15 दिवसांवर आलाय. मात्र या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. यंदाचा गणेशोत्सव नियम आणि अटीनुसार साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पोलीस प्रशासनानं यंदा मंदिरातच श्रींची प्रतिष्ठापना करण्याचं आवाहन केलंय. मात्र अजूनही शहरातील मंदिरं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदच आहेत. त्यामुळे गणेश मंडळांसमोर काहीसं संभ्रमाचे वातावरण आहे (Ganesh Mandal on Pune Ganeshotsav).

गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असतानाही संभ्रम असल्याने गणेश मंडाळांसमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. असं असलं तरी पुण्यातील मानाचा पहिला गणपती ‘श्री कसबा गणपती मंडळानं’ मंडपाचं पूजन केलंय. दरवर्षी गणेश चतुर्थीला मंडपाचे पूजन केलं जातं. त्यानुसार शुक्रवारी (7 जुलै) सायंकाळी पारंपारिक जागेत पूजन करण्यात आलं. 127 वर्षांपासून मंडप उभारणीच्या वाशाचं पूजन केलं जातं. मंडप पूजन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मंडप गणेशोत्सवाला सुरुवात होते.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा उत्सव मंडपात करायचा की मंदिरात करायचा, याबाबत निर्णय झालेला नाही. 2 दिवसात याबाबत निर्णय होणार आहे. यासंदर्भात विश्वस्तांशी चर्चा सुरु आहे. मंदिरात जागा अपुरी असल्यानं पारंपारिक धार्मिक विधी करण्यास मर्यादा येणार असल्याचं मत आहे. मंडपात उत्सव करण्याचा निर्णय घेतला, तर मंडपाचा आकार कमी करण्यात येईल. मंडपाचा आकार कमी करुन तीस ते पस्तीस फुटांचा ठेवण्यात येईल, अशी माहिती उत्सव प्रमुखांनी दिली.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

पुण्यातील गणेशोत्सवाचे नियम

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पुण्यात गणेश उत्सवा संदर्भात काटेकोर नियमावली ठरवण्यात आली आहे (Rules for Ganeshotsav in Pune). गणेश मंडळांच्या बैठकीत सर्वांची मतं आणि सूचना जाणून घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ही नियमावली बनवली आहे. या बैठकीतील निर्णयाप्रमाणे गणपती बाप्पाच्या मिरवणुकीस मनाई करण्यात आली. त्याचबरोबर बाप्पासाठी मांडव उभारण्यासही मनाई करण्यात आली आहे. याशिवाय देखावे सादर करण्यास आणि गर्दी जमवण्यासह मनाई करण्यात आली.

जिल्हा प्रशासनाने बोलावलेल्या या बैठकीत गणेश मंडळांनीही प्रशासकीय यंत्रणांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या. उत्सवाच्या बाबतीत कुणासोबतही दूजाभाव होऊ नये, शहरातील सर्व मंडळांसाठी सारखेच नियम असावेत, अशी मागणी या गणेश मंडळांनी केली. तसेच सर्वांना नियम सारखे असतील तरच सर्व गणेश मंडळांचे सहकार्य लाभेल, असं मत मंडळाच्यावतीने मांडण्यात आलं.

हेही वाचा :

पुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह ‘या’ गोष्टींना मनाई

‘कोकणी माणसाचा महिना फुकट जातोय’, काँग्रेस नेत्याची क्वारंटाईन हटवण्याची मागणी

Ganeshotsava | गणेशोत्सवात ढोल-ताशाचा गजरही बंद, पथकांची आर्थिक घडी विस्कटण्याची चिंता

Ganesh Mandal on Pune Ganeshotsav

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.