चंद्रपुरात जुन्या वादातून कोळसा व्यवसायिकाची हत्या, दोन आरोपींना अटक

चंद्रपुरातील बल्लारपूर शहरात गोळ्या घालून कोळसा व्यवसाय करणाऱ्या युवकाची हत्या करण्यात (Chandrapur coal businessman killed) आली.

चंद्रपुरात जुन्या वादातून कोळसा व्यवसायिकाची हत्या, दोन आरोपींना अटक

चंद्रपूर : चंद्रपुरातील बल्लारपूर शहरात गोळ्या घालून कोळसा व्यवसाय करणाऱ्या युवकाची हत्या करण्यात आली. सुरज बहुरिया असे हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे बल्लापूर शहरात प्रचंड तणावाचे वातावरण पसरले आहे. (Chandrapur coal businessman killed)

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात भरदिवसा चौकात झालेल्या एका हत्येने दहशतीचे वातावरण पसरले आहे. सुरज बहुरिया नावाच्या कोळसा व्यवसायिकाचा चंद्रपुरात व्यवसाय आहे. त्याची गोळ्या घालून दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. बल्लारपूर शहरातील जुना बस स्टँड भागात हा प्रकार घडला.

सुरज बहुरिया हे एका हॉटेलमध्ये जेवण करत होते. जेवण झाल्यानंतर सुरज कारमध्ये बसण्यास गेले. त्याचवेळी काही युवक दुचाकीने कारजवळ आले. त्यांनी जवळ येत त्यांनी गोळ्या झाडून सुरजची हत्या केली.

या घटनेनंतर सुरजच्या सहकाऱ्यांनी तातडीने त्याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले. मात्र जिल्हा रुग्णालयात समर्थकांनी गोंधळ घातला. त्यानंतर तो मृतदेह रुग्णवाहिकेत टाकत रुग्णवाहिका बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या समोर आणली. यामुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली.

जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली. घटनास्थळावरुन तीन रिकामी काडतूसे तर तीन भरलेल्या गोळ्या आढळून आल्या. पोलिसांनी या हत्येप्रकरणी अल्फ्रेड अँथनी आणि प्रणय सेजल अशा 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. अद्याप इतरांचा शोध सुरु आहे. (Chandrapur coal businessman killed)

संबंधित बातम्या : 

विवाहबाह्य संबंधातून पतीची हत्या, नागपुरात महिलेसह बॉयफ्रेंड रंगेहाथ अटक

वर्ध्यात केसांनी अट्टल चोरट्याचा घात, हुशार पोलिसांनी छोट्याशा सुगाव्यावरुन चोराला पकडलं

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *