विवाहबाह्य संबंधातून पतीची हत्या, नागपुरात महिलेसह बॉयफ्रेंड रंगेहाथ अटक

राजू हरिदास उरकुडे यांच्या हत्येप्रकरणी कामठी पोलिसांनी पत्नी, तिचा प्रियकर आणि प्रियकराच्या भावाला घटनास्थळावरुन अटक केली.

विवाहबाह्य संबंधातून पतीची हत्या, नागपुरात महिलेसह बॉयफ्रेंड रंगेहाथ अटक

नागपूर : विवाहबाह्य संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीची पत्नीने हत्या केल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील कामठीमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. (Nagpur Wife kills husband with boyfriend)

मयत राजू हरिदास उरकुडे हे कामठी नगरपालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत होते. त्यांच्या हत्येप्रकरणी कामठी पोलिसांनी पत्नी, तिचा प्रियकर आणि प्रियकराच्या भावाला घटनास्थळावरुन अटक केली.

राजू उरकुडे, पत्नी शुभांगी आणि त्यांचा पाच वर्षीय मुलगा असे तिघे नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत भीमनगर येथे राहायला होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा पत्नीसोबत कौटुंबिक कारणावरुन वाद सुरु होता.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

उरकुडे कुटुंब राहत असलेल्या शासकीय वसाहतीतील रुपेश बिहारा या तरुणासोबत शुभांगीचे प्रेमसंबंध असल्याची कुणकुण राजू यांना लागली. त्यामुळे त्यांनी वसाहत सोडून भाड्याने खोली घेऊन राहायला सुरुवात केली.

नवीन ठिकाणी जाऊनही तोच प्रकार सुरु असल्याने राजू आणि शुभांगी यांच्यामध्ये वाद वाढला. अखेर काल रात्री दोन वाजताच्या सुमारास आरोपी शुभांगीने आपला प्रियकर रुपेश आणि त्याचा चुलत भाऊ हरिशचंद्र यांना बोलावून घेतले.

हेही वाचा : भाडेकरु आणि घरमालकाच्या पत्नीचा मृतदेह सापडला, अहमदनगरमध्ये खळबळ

तिघांनी राजूचे हात-पाय बांधले आणि उशीच्या मदतीने त्याची तोंड दाबून हत्या केली. घटनेची माहिती समजताच नवीन कामठी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा तीनही आरोपी घटनास्थळीच आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रंगेहाथ अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची गळा चिरुन हत्या, नांदगाव हादरले

कॅमेरा सेट करुन फेसबुक लाईव्ह, पंख्याला दोरी बांधून आत्महत्या

(Nagpur Wife kills husband with boyfriend)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *