PUBG गेम खेळू दिला नाही, मुलाने वडिलांच्या शरीराचे तीन तुकडे केले

PUBG गेम खेळून न दिल्याने एका विकृत मुलाने जन्मदात्या वडिलांची गळा चिरुन हत्या (Murder) केली. ही धक्कादायक घटना आज (9 सप्टेंबर) कर्नाटकातील काकती येथे घडली.

PUBG गेम खेळू दिला नाही, मुलाने वडिलांच्या शरीराचे तीन तुकडे केले

बंगळुरु (कर्नाटक) : PUBG गेम खेळून न दिल्याने एका विकृत मुलाने जन्मदात्या वडिलांची गळा चिरुन हत्या (Murder) केली. ही धक्कादायक घटना आज (9 सप्टेंबर) कर्नाटकातील काकती येथे घडली. या विकृत मुलाने वडिलांची हत्या करुन त्यांचे धड वेगळे करत शरीराचे तीन तुकडे केले. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रघुवीर कुंभार असं या मुलाचं नाव आहे.

रात्री उशिरापर्यंत मुलगा PUBG गेम खेळत होता. गेम खेळणाऱ्या मुलाला वडिलांनी झोप म्हणून सांगितले. पण त्याने वडिलांचे ऐकले नाही. मुलगा ऐकत नसल्याने वडिलांनी मोबाईल काढून घेतला. मोबाईल काढून घेतल्यामुळे संतापलेल्या मुलाने थेट वडिलांवर हल्ला करत त्यांची निर्घुण हत्या केली. यावेळी त्याने आईला दुसऱ्या घरात कोंडून ठेवले आणि घरातील विळ्याने वडिलांच्या शरीराचे तीन तुकडे केले.

रघुवीर हा तीन वेळा डिप्लोमा परिक्षेत नापास झाला होता. त्यामुळे तो कामधंदा न करता घरी बसून दिवस-रात्र मोबाईलवर पब्जी गेम खेळत होता. तर त्याचे वडील शंकर कुंभार हे तीन महिन्यापूर्वीच जिल्हा सशस्त्र पोलीस दलातून निवृत्त झाले होते.

या घटनेची नोंद काकती पोलीस स्थानकात केली असून वरीष्ठ पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. मानसिक विकृतीतून ही हत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मोबाईलचा अती वापर माणसाला विकृत बनवतो का? असा प्रश्न आता उपस्थित राहत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *