उस्मानाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर चौघांचा अत्याचार, पीडितेची प्रकृती चिंताजनक; नराधम पोलिसांच्या ताब्यात

चौघा नराधमांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. या मुलीची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

उस्मानाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर चौघांचा अत्याचार, पीडितेची प्रकृती चिंताजनक; नराधम पोलिसांच्या ताब्यात

उस्मानाबाद : लातुरात अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Latur Minor Rape Case). लातूरच्या शासकीय रुग्णालयात या मुलीवर उपचार सुरु आहेत. चौघा नराधमांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. या मुलीची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे पुढील 48 तास डॉक्टरांनी पीडितेला देखरेखीखाली ठेवले आहे (Latur Minor Rape Case).

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सास्तूर इथे ही अकरा वर्षीय मुलगी मंदिराजवळ खेळत होती. यावेळी चौघांनी या मुलीला बाजूला नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडिता पोटदुखी आणि रक्तस्त्रावाने त्रस्त होती. तिला सास्तूर येथील रुग्णालयात उपचार करुन पुढील उपचारासाठी लातूरला पाठवण्यात आले आहे.

मुलीचे आई-वडील शेत मजूर आहेत. ही घटना दोन दिवसांपूर्वीची (18 ऑक्टोबर) आहे. या घटनेला दोन दिवस झाले तरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्या उस्मानाबाद दौरा आहे आणि त्यामुळे ही घटना दडपण्याचा पोलीस प्रयत्न करत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. आमदार अभिमन्यू पवार यांनी पीडितेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि तिच्या आई -वडिलांना धीर दिला आहे.

आमदार अभिमन्यू पवार दवाखान्यात पोहोचल्यानंतर आता पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Latur Minor Rape Case

संबंधित बातम्या :

अनैतिक संबंधातून तिघी मायलेकींची हत्या, बुलडाणा हादरलं!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *