अमेरिकावारी टाळण्यासाठी पुण्यात महिलेकडून पोटच्या मुलीची हत्या

पतीसोबत अमेरिकेला जाण्यावरुन झालेल्या वादातून पुण्यात महिलेने आपल्या सख्ख्या मुलीची हत्या केली आहे. सहा वर्षांची चिमुरडी ही अमेरिकन नागरिक असल्याची माहिती आहे

अमेरिकावारी टाळण्यासाठी पुण्यात महिलेकडून पोटच्या मुलीची हत्या

पुणे : अमेरिकेला जाणं टाळण्यासाठी महिलेने पोटच्या मुलीची हत्या (Pune Mother Killed Daughter) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. सहा वर्षांच्या चिमुरडीच्या हाताच्या दोन्ही नसा कापून आईने जीव घेतला. दत्तवाडी पोलिसांनी आरोपी श्वेता पाटीलला बेड्या ठोकल्या आहेत.

पुण्यातील तावरे कॉलनीमध्ये सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. श्वेता पाटील यांनी मुलगी अक्षराच्या हाताच्या दोन्ही नसा कापल्यामुळे (Pune Mother Killed Daughter) तिचा मृत्यू झाला.

आरोपी श्वेताचे पती अमित पाटील एका मल्टिनॅशनल संगणक कंपनीत नोकरी करतात. पाटील कुटुंब सहा वर्ष अमेरिकेत स्थायिक होतं. अक्षराचा जन्मही अमेरिकेतच झाल्यामुळे ती अमेरिकन नागरिक आहे.

चार वर्षांपूर्वी पाटील दाम्पत्य मुलगी अक्षरासह पुण्यात आलं. अमित पाटील यांना पुन्हा अमेरिकेला जाण्याची संधी आल्यामुळे ते सहकुटुंब व्हिसासाठी चेन्नईला जाणार होते. मात्र श्वेताला अमेरिकेला जाण्याची इच्छा नव्हती.

पतीच्या अमेरिकावारीच्या निर्णयामुळे श्वेता काही दिवसांपासून अस्वस्थ होती. अमेरिकेला जाणं ती टाळत होती. त्यामुळे मुलीला घेऊन ती तावरे कॉलनीतील नातेवाईकांच्या घरी आली होती. त्यावेळी अमितचे वडील आणि भाऊही त्यांच्या सोबत होते. दोघांनी तिला समजावून मुलीसह गाडीत बसवलं.

वॉशरुमला जाण्याचा बहाणा करुन श्वेता अक्षराला घेऊन गाडीतून उतरली आणि पुन्हा घरात गेली. स्वयंपाक घराचं दार लावून तिने सुरीने अक्षराच्या दोन्ही हाताच्या नस कापल्या. यामध्ये अक्षराचा मृत्यू ओढावला.

दरम्यान, 2015 पासून श्वेतावर मानसोपचार तज्ञांकडे उपचार सुरु असल्याची माहिती आहे. पुण्यातील दत्तवाडी पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

गेल्या काही दिवसात पुणे आणि आसपासच्या परिसरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे. गेल्याच आठवड्यात अल्पवयीन मुलीची लॉजमध्ये नेऊन हत्या केलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. आरोपी तरुणाचा शोध घेताना पोलिसांना त्याचा मृतदेह इंद्रायणी नदीत हाती लागला होता.

संबंधित बातम्या :

अगोदर प्रेयसीची लॉजवर नेऊन हत्या, नंतर तरुणाची इंद्रायणी नदीत आत्महत्या

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *