अगोदर प्रेयसीची लॉजवर नेऊन हत्या, नंतर तरुणाची इंद्रायणी नदीत आत्महत्या

आपलं पहिलं आणि अखेरचं प्रेम संपलं असून मी या जगाचा निरोप घेतोय, असं व्हॉट्सअप स्टेटस या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी ठेवलं होतं. यानंतर इंद्रायणी नदीत उडी घेऊन या तरुणाने जीवन संपवलं.

अगोदर प्रेयसीची लॉजवर नेऊन हत्या, नंतर तरुणाची इंद्रायणी नदीत आत्महत्या
Follow us
| Updated on: Sep 06, 2019 | 4:47 PM

पुणे : अल्पवयीन मुलीची लॉजमध्ये नेऊन हत्या केलेल्या तरुणाने स्वतः आत्महत्या (Pune couple suicide) केली. मुलीच्या हत्येनंतर पोलीस या तरुणाचा शोध घेत होते. यानंतर 48 तासांनी त्याचा मृतदेह हाती लागला. पोलिसांची सहा पथकं या तरुणाच्या (Pune couple suicide) शोधात होती. आपलं पहिलं आणि अखेरचं प्रेम संपलं असून मी या जगाचा निरोप घेतोय, असं व्हॉट्सअप स्टेटस या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी ठेवलं होतं. यानंतर इंद्रायणी नदीत उडी घेऊन या तरुणाने जीवन संपवलं.

प्रेम प्रकरणातून अल्पवयीन प्रेयसीची हत्या (Pune Girl Murder) करुन प्रियकर पसार झाला होता. पुणे जिल्ह्यात मावळमधील वडगाव एमआयडीसी रोडवर (Wadgaon MIDC Road) असलेल्या लॉजवर हा धक्कादायक प्रकार घडला.

विशाल लॉन्सजवळ असलेल्या ‘निसर्गवारा स्पॉट ऑन’ लॉजवर बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास एक जोडपं आलं. ते जोडपे लॉजमधील रुम नंबर 303 मध्ये थांबलं होतं. लॉजवर आलेली तरुणी ही शाळेच्या गणवेशातच आली होती.

काही कारणाने झालेल्या वादातून तरुणाने तरुणीच्या गळ्यावर, हातावर आणि पोटावर ब्लेडने वार केले, यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी श्रीराम गिरी लॉजमधून पळून गेला. मयत तरुणी अल्पवयीन असल्याचं समोर आलं.

आरोपीच्या शोधात पुणे ग्रामीण पोलिसांची सहा पथकं रवाना करण्यात आली. लॉजवरही कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सूचित केलं. तरुणी अल्पवयीन असताना तिला एका तरुणासोबत लॉजमध्ये जाऊ कसं दिलं, आयकार्ड तपासलं नाही का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.