AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अ‍ॅसिड हल्ल्यात वाचलेली मुलगी दहावीत आली टॉप, वडील शिपायाचे काम करतात, अंध असूनही मिळविले 95.2 टक्के

चंदीगडच्या एका अ‍ॅसिड हल्ला पीडीत मुलीने सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत शाळेतून प्रथम येण्याची कामगिरी केली आहे. अंध असूनही तिने हे यश मिळविल्याने सर्वत्र तिचे कौतूक होत आहे.

अ‍ॅसिड हल्ल्यात वाचलेली मुलगी दहावीत आली टॉप, वडील शिपायाचे काम करतात, अंध असूनही मिळविले 95.2 टक्के
braille languageImage Credit source: socialmedia
| Updated on: May 14, 2023 | 7:21 PM
Share

मुंबई : कौन कहता है आसमां में सुराख नहीं हो सकता एक पत्थर तो तबियत से उछालो यारों..असा एक शेर प्रसिद्ध आहे. जर माणसाकडे जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर किती संकटे आली तरी माणूस त्यावर मात करून आपल्याला हवे तसे आपले आयुष्याचं सोनं करु शकतो. इच्छा असेल तर मार्ग आपोआप निघून माणसाच्या पंखात बळ येते…आता सीबीएसईचे निकाल नुकतेच लागले आहेत. यात देशभरातील लाखो विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीबीएसई परीक्षेत चंदीगडच्या एका अ‍ॅसिड हल्ला पिडीत मुलीने दहावीच्या परीक्षेत 95.2 टक्के मिळवित नवा इतिहास रचला आहे. तिची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

12 मे रोजी सीबीएसई परीक्षेचे दहावी आणि बारावीचे निकाल लागले आहेत. यंदा 10 च्या परीक्षेत उत्तीर्णतेचे पर्सेटाइल 95.2 टक्के होते. सीबीएसई दहावीच्या परीक्षेत चंदीगडच्या 15 वर्षीय काफी हीला 95.2 टक्के मिळाले आहेत. काफी अवघी तीन वर्षांची असताना तिच्यावर त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी अ‍ॅसिड टाकले. त्यामुळे तिचा संपूर्ण चेहरा तर भाजलाच शिवाय तिची दृष्टी देखील गेली. त्यामुळे तिने ब्रेल लिपीतून दहावीचा अभ्यास केला. आणि ती तिच्या शाळेतील टॉपर बनली आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना काफी हीने सांगितले की, मी दर दिवशी पाच ते सहा तास अभ्यास करायची. माझे आई-वडील आणि शिक्षकांनी मला खूपच सहकार्य केले. आपल्या मोठेपणी आयएएस अधिकारी बनून देश आणि समाजाची सेवा करायची आहे असे तिने म्हटले आहे.

वडील आहेत शिपाई

काफी हीचे वडील हरीयाणा सचिवालयात शिपायाची नोकरी करतात. आता ते आपल्या कुटुंबियासह शास्रीनगरात राहतात. काफी हीचे वडील पवन म्हणतात की काफी जेव्हा तीन वर्षांची होती तेव्हा त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अ‍ॅसिडचा हल्ला केला. त्यात काफी हीला प्रचंड जखमा झाल्या. तिची डोळ्यांची दृष्टी गेल्याने तिचे वडीलांनी अनेक ठीकाणच्या डॉक्टरांना तिला दाखविले परंतू काही उपयोग झाला नाही. त्यांनी त्यांच्या लेकीला खूप शिकवायचे असे ठरविले. तिला आयएएसची तयारी करायची असल्याचे त्यांनी सांगितले. आपण तिला संपूर्णपणे सहकार्य करणार असून तिच्या सर्व इच्छा पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.