आधी CBSE कडून दहावीची परीक्षा रद्द, आता UP बोर्डाची परीक्षा स्थगित, महाराष्ट्रात काय होणार?

सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता उत्तर प्रदेश (Uttar Pradesh Board) बोर्डानेही मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश बोर्डाने दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे.

आधी CBSE कडून दहावीची परीक्षा रद्द, आता UP बोर्डाची परीक्षा स्थगित, महाराष्ट्रात काय होणार?
Student
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 5:02 PM

लखनऊ : सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता उत्तर प्रदेश (Uttar Pradesh Board) बोर्डानेही मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश बोर्डाने दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. उत्तर प्रदेशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Cm Yogi aadityanath)यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. योगी आदित्यनात यांनी 11 जणांच्या टीमसोबत चर्चा केल्यानंतर उत्तर प्रदेशातील सर्व शाळा 15 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पुढील आदेशापर्यंत बोर्डाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. (After CBSE board exams, Uttar Pradesh board exams 2021 postponed due to COVID 19 pandemic, what will maharashtra state board do ssc hsc exams update)

यूपी बोर्डाच्या परीक्षांबाबत सध्या तरी नव्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. मे महिन्यात त्याबाबत विचार केला जाईल. यूपीमध्ये बोर्ड परीक्षा एप्रिलला नियोजित होत्या. त्यांची तारीख पुढे ढकलून 8 मेपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र आता ही तारीखही पुढे ढकलली आहे.

नुकतंच यूपीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री दिनेश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात दहावी-बारावीचे जवळपास 56 लाख विद्यार्थी परीक्षा देतात.

CBSE परीक्षांबाबत मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या संदर्भात 14 एप्रिलला बैठक घेतली होती. त्यानंतर CBSE बोर्डाने  दहावीची परीक्षा रद्द तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षा घेण्यासंदर्भात 1 जूनला परिस्थितीची पाहणी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. त्यामुळे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा जूनपर्यंत होणार का? हे पाहावं लागेल.

महाराष्ट्र बोर्ड परीक्षा पुढे ढकलल्या

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार बारावीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तर जून महिन्यात दहावीची परीक्षा आयोजित केली जाईल.

सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा आणि दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं घेतला आहे. महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षांबाबत काय निर्णय होणार याकडं राज्यातील विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सीबीएसई बोर्डाच्या निर्णयाचा अभ्यास करु ,  राज्यातील बोर्डाच्या परीक्षांबाबत आम्ही तज्ञांचं मत घेऊ, असं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या   

SSC, HSC Board Exam 2021 Postponed : दहावी बारावीच्या नव्या वेळापत्रकानुसार परीक्षा कधी सुरु होणार? वर्षा गायकवाड यांनी काय सांगितलं?

CBSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द, महाराष्ट्र बोर्डाचं काय?, वर्षा गायकवाड म्हणाल्या…

CBSE 10th Exam 2021 Cancelled: सीबीएसई बोर्डाचा मोठा निर्णय, दहावीची परीक्षा रद्द, 12 वीची परीक्षा पुढे ढकलली

(After CBSE board exams, Uttar Pradesh board exams 2021 postponed due to COVID 19 pandemic, what will maharashtra state board do ssc hsc exams update)
Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.