SSC, HSC Board Exam 2021 Postponed : दहावी बारावीच्या नव्या वेळापत्रकानुसार परीक्षा कधी सुरु होणार? वर्षा गायकवाड यांनी काय सांगितलं?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Maharashtra SSC HSC exam Postponed

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:35 PM, 12 Apr 2021
SSC, HSC Board Exam 2021 Postponed : दहावी बारावीच्या नव्या वेळापत्रकानुसार परीक्षा कधी सुरु होणार? वर्षा गायकवाड यांनी काय सांगितलं?
वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

मुंबई: दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत कोणता निर्णय घ्यायचा याविषयी शालेय शिक्षण विभाग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीतील चर्चेनुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार बारावीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तर जून महिन्यात दहावीची परीक्षा आयोजित केली जाईल. (Maharashtra SSC HSC exam Postponed Education Minister Varsha Gaikwad said hsc exam held on May end and SSC held in June after meeting with cm Uddhav Thackeray)

वर्षा गायकवाड यांच्याकडून बारावी आणि दहावीच्या परीक्षांबाबत नवी घोषणा

दहावी आणि बारावीच्या परीक्षा कधी? वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणाल्या?

महाराष्ट्रातील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती पाहून आम्ही दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेत आहोत. विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचं वेळापत्रक डोळ्यासमोर ठेवून 12 वीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरिस तर 10 वीच्या परीक्षा जून महिन्यात घेणार आहेत.

सर्वांशी चर्चा करुन निर्णय

वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागातील सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेतल्याची माहिती दिली. विद्यार्थी, शिक्षक, पालक , लोकप्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणसंस्था यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे आभार मानते, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

परीक्षा पुढे ढकललेल्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत काळजी घेतली जाईल, अशा मूल्यांकन पद्धती बाबत चर्चा करत आहेत. सीबीएसई, आयसीएसई, आयबी आणि केंब्रिज बोर्डाला त्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विचार करावा, असं कळवण्यात आल्याचं, वर्षा गायकवाड म्हणाल्या.

संबंधित बातम्या:

SSC, HSC Board Exam 2021 Postponed : दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, ठाकरे सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

Maharashtra SSC, HSC Exams 2021: | दहावी-बारावी परीक्षा पुढे ढकलल्या, मुख्यमंत्री-शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

(Maharashtra SSC HSC exam Postponed Education Minister Varsha Gaikwad said hsc exam held on May end and SSC held in June after meeting with cm Uddhav Thackeray)