AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CBSE Exam: नरेंद्र मोदींची सीबीएसई बोर्ड परीक्षेसंदर्भात महत्वाची बैठक, मोठा निर्णय होणार?

CBSE:नरेंद्र मोदींची सीबीएसई बोर्ड परीक्षेसंदर्भात बैठक, मोठा निर्णय होणार?

CBSE Exam: नरेंद्र मोदींची सीबीएसई बोर्ड परीक्षेसंदर्भात महत्वाची बैठक, मोठा निर्णय होणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Updated on: Apr 14, 2021 | 11:40 AM
Share

CBSE Board Exam नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या (CBSE Board Exams ) संदर्भात  दुपारी 12 वाजता बैठक घेणार आहेत. या बैठकीला केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, सीबीएसईचे सचिव आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये सीबीएसई परीक्षेबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. ( PM Narendra Modi hold a meeting with Education Minister, Secretary & other important officials to discuss issue of CBSE Board Exams)

सीबीएसई बोर्डाच्या लेखी परीक्षेला 4 मे पासून सुरुवात होणार आहे. सध्या देशात 1 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षा रद्द करा, अशी मागणी सोशल मीडियावर केली होती. कोरोना संसर्ग पाहता महाराष्ट्रातील  दहावी आणि बारावीच्या परीक्षा यापूर्वीच पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. नरेंद्र मोदी दुपारी 12 वाजता घेत असलेल्या बैठकीत सीबीएसई परीक्षा पुढे ढकलणार का? हे पाहावं लागणार आहे.

एएनआय वृत्तसंस्थेचं ट्विट

सीबीएसई बोर्ड लेखी परीक्षा 4 मे पासून सुरु

सीबीएसई बोर्ड परीक्षा 2021 (CBSE Board examinations- 2021) ची प्रात्यक्षिक परीक्षा 1 मार्चपासून सुरु झाल्या आहेत.  सीबीएसई बोर्ड लेखी परीक्षा 4 मे रोजी सुरु होणार आहेत  त्या 10 जूनपर्यंत सुरु राहतील. तर, CBSE परीक्षांचा निकाल 15 जुलैपर्यंत लागणे अपेक्षित आहे.  मात्र, देशातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे देशातील विद्यार्थ्यांनी सीबीएसई परीक्षा रद्द करण्याची किंवा ऑनलाईन पद्धतीनं घ्यावी, अशी मागणी करत आहेत.

प्रियांका गांधीची सीबीएसई बोर्डावर टीका

प्रियांका गांधी यांनी ट्विट करुन सीबीएसई बोर्डावर निशाणा साधला. सीबीएसईसारख्या बोर्डांनी विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीत परीक्षा द्यायला भाग पाडणं बेजबाबदारपणाचं आहे.सध्या बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात किंवा परीक्षा पुढे ढकलून नवं वेळापत्रक जारी करावं, अशी मागणी प्रियांका गंधी यांनी केली. याशिवाय विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, अशा पद्धतीनं परीक्षांचं नियोजन करावं, अशी मागणी प्रियांका गांधी यांनी केली.

बोर्ड परीक्षा रद्द करा, 1 लाख विदयार्थ्यांची मागणी

सध्या वाढलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या एक लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करा किंवा ऑनलाईन पद्धतीनं घ्या, असी मागणी केली आहे. मात्र, सीबीएसईनं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्यात आल्याची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांकडून परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित कराव्यात यासाठी मागणी करण्यात येत आहे. सीबीएसईच्या लेखी परीक्षांना 4 मेपासून सुरुवात होणार आहे.

संबंधित बातम्या:

CBSE Board Exam 2021: सीबीएसई बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात,वाचा सविस्तर

CBSE Exam class 10: सामाजिक विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमाविषयी अफवा, सीबीएसईकडून स्पष्टीकरण

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.