CBSE Exam class 10: सामाजिक विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमाविषयी अफवा, सीबीएसईकडून स्पष्टीकरण

CBSE Exam class 10: सामाजिक विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमाविषयी अफवा, सीबीएसईने फेटाळले वृत्त (CBSE denies rumors about social science curriculum)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:13 PM, 26 Feb 2021
CBSE Exam class 10: सामाजिक विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमाविषयी अफवा, सीबीएसईकडून स्पष्टीकरण
आयसीएसई आणि आयएससी परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात सीबीएसई बोर्डाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार अभ्यासक्रमात 30 टक्के कपात केली होती. आता असे म्हटले जात आहे की, विद्यार्थ्यांसाठी सोशल सायन्स थिअरीच्या विषयातून पाच युनिट्स काढून टाकण्यात आली आहेत. या वृत्त खोडून काढत ही अफवा असल्याचे सीबीएसईने म्हटले आहे. तसेच सामाजिक विज्ञान अभ्यासक्रमातील कपातीच्या अफवेबाबत शिक्षण मंडळ कोणतेही अधिकृत विधान करणार नाही. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीच्या सामाजिक विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम कमी केल्याचे वृत्त पसरविण्यात आले होते. सामाजिक विज्ञान पेपर 27 मे रोजी आहे. अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करुन जो सुधारित अभ्यासक्रम सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केला आहे त्या आधारे अभ्यास करा, सल्ला या अफवेमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येत होता. मात्र सीबीएसईने हे वृत्त केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. (CBSE denies rumors about social science curriculum)

नवीन सीबीएसई अभ्यासक्रम 2020-21

सीबीएसईने नुकतेच 2020-21 शैक्षणिक सत्रासाठी (9 वी, 10, 11 व 12) अभ्यासक्रम जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना नवीन सीबीएसई अभ्यासक्रम 2020-21 अभ्यासासाठी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या तारखांची घोषणा झाली आहे. बोर्ड परीक्षा 4 मे 2021 पासून सुरू होईल आणि 10 जून 2021 पर्यंत घेण्यात येईल.

याआधीच अभ्यासक्रमात 30% घट

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांच्या पेपर पॅटर्नवर, परीक्षा नियंत्रक म्हणाले की, बोर्डाच्या परीक्षांचे पेपर पॅटर्न बोर्डाद्वारे जारी केलेल्या पॅटर्न पेपरसारखेच असतील. सीबीएसई यापुढील आगामी बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये सीबीएसई सुधारणा करणार नाही कारण यावर्षीच्या अभ्यासक्रमासाठी मंडळाने यापूर्वी 30 टक्क्यांची कपात केली आहे. बोर्ड परीक्षा केंद्रांची संख्येत वाढ करेल, परीक्षा स्वत: केंद्रित होणार नाही.

एका वर्गात 12 परीक्षार्थी

परीक्षेच्या दरम्यान एका वर्गात केवळ 12 विद्यार्थ्यांना बसण्याची अनुमती असेल. परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकांचे तीन सेट पाठवले जातील. दहावीच्या वर्गासाठी 80+20 चा फॉर्म्युला लागू असेल, यात 80 नंबर थिअरी व 20 नंबर इंटरनल मूल्यांकनासाठी देण्यात येतील. (CBSE denies rumors about social science curriculum)

 

इतर बातम्या

High Blood Pressure | केवळ मीठच नव्हे, उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी चुकनही खाऊ नयेत ‘या’ गोष्टी!

RBI Grade B Phase 1 Admit Card 2021: प्रिलिम परीक्षेचे हॉल तिकिट जारी, असे करा डाऊनलोड