AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अकरावीच्या प्रवेशाचे नियोजित वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तपशीलवार माहिती

प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या, एक विशेष फेरी होईल. तर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीऐवजी प्रतीक्षा यादी करण्याचे नियोजन असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी 23मे ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत सुरू राहील.

अकरावीच्या प्रवेशाचे नियोजित वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तपशीलवार माहिती
प्रातिनिधीक फोटो Image Credit source: tv9
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 18, 2022 | 6:33 PM
Share

पुणे – राज्यात दरवर्षी दहावीच्या निकालानंतर (SSC result) अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया राबवली जाते. मात्र यंदा 2022-23  मधील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. येत्या 1 ते 14 मे दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज ऑनलाइन (Online Application )पद्धती कसा भरायचा याचा सराव करता येणार आहे. 17  मे पासून प्रत्यक्ष अर्ज भरणे, अर्ज पडताळणीची सुरु होणार आहे. अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. शिक्षण मंडाळाने आगामी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधीच्या मार्गदर्शक सूचना , संभाव्य वेळापत्रक (Possible schedule) परिपत्रकाद्वारे जाहीर केल्या आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक या महापालिका क्षेत्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते.

अशी राबवली जाईल प्रक्रिया

  • शिक्षण मंडळाच्या निर्णयानुसार प्रवेश प्रक्रियेमध्ये निकाल जाहीर होण्यापूर्वी 17 मेपर्यंत प्रवेश अर्जाचा भाग 1 भरला जाईल.
  • दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया राबवली जाईल.
  • निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश अर्जाचा भाग दोन भरून, महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवणे.
  • गुणवत्ता यादी जाहीर करणे, प्रत्यक्ष प्रवेश देणे या प्रक्रिया पारपडल्या जाणार आहेत.

या संकेतस्थळावर पाहा माहिती

प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या, एक विशेष फेरी होईल. तर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीऐवजी प्रतीक्षा यादी करण्याचे नियोजन असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी 23मे ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत सुरू राहील. प्रवेश प्रक्रियेची माहिती https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

  तयारी सुरु करावी

अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन  प्रवेश प्रक्रियेचे टप्पे समजावून घेऊन त्यानुसार नियोजन करावे. पालक विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्ग, शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करावे. विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याबाबत संबंधित यंत्रणेस विनंती करावी, अशा सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिल्या आहेत.

Sangli Sabha : सांगलीत महापालिका महासभेत प्रचंड गदारोळ, महिला नगरसेवकांनी राजदंड पळवला

Jitendra Awhad on Raj Thackeray: राज ठाकरे अयोध्येत जाऊदेत किंवा अमृतसरला, आम्हाला काय करायचंय?; आव्हाडांनी फटकारले

Sangli Sabha : सांगलीत महापालिका महासभेत प्रचंड गदारोळ, महिला नगरसेवकांनी राजदंड पळवला

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?