AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jitendra Awhad on Raj Thackeray: राज ठाकरे अयोध्येत जाऊदेत किंवा अमृतसरला, आम्हाला काय करायचंय?; आव्हाडांनी फटकारले

Jitendra Awhad on Raj Thackeray: कोण अयोध्येत गेला काय किंवा राममंदिरात गेला काय... सर्वसामान्यांच्या जीवनात महागाईचे जे चटके बसत आहेत ते कमी होणार आहेत का? असा संतप्त सवाल करतानाच राज ठाकरे अयोध्येत जाऊदेत किंवा अमृतसरला... कोण कुठे जाणार आहेत त्याच्याशी आम्हाला काय करायचं आहे?

Jitendra Awhad on Raj Thackeray: राज ठाकरे अयोध्येत जाऊदेत किंवा अमृतसरला, आम्हाला काय करायचंय?; आव्हाडांनी फटकारले
राज ठाकरे अयोध्येत जाऊदेत किंवा अमृतसरला, आम्हाला काय करायचंय?; आव्हाडांनी फटकारलेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 18, 2022 | 6:14 PM
Share

मुंबई: कोण अयोध्येत गेला काय किंवा राममंदिरात गेला काय… सर्वसामान्यांच्या जीवनात महागाईचे जे चटके बसत आहेत ते कमी होणार आहेत का? असा संतप्त सवाल करतानाच राज ठाकरे (Raj Thackeray) अयोध्येत जाऊदेत किंवा अमृतसरला… कोण कुठे जाणार आहेत त्याच्याशी आम्हाला काय करायचं आहे? त्यांना कुठली सुरक्षा देणार आहेत त्याच्याशी आमचा काय संबंध? त्यांना मोसा चिमुर द्या नाहीतर अमेरिकेची सीआयए द्या… अशी उपरोधिक टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली. आव्हाड राष्ट्रवादीच्या (ncp) जनता दरबार उपक्रमास आले होते. यावेळी माध्यमांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा प्रश्न विचारला असता जितेंद्र आव्हाड यांनी कोण कुठेही जाऊदे, आम्ही फक्त महागाईवर बोलणार, असे स्पष्ट केले.

महागाईकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावं आणि तुमच्या हेडलाईन्स महागाईवर कसं बोलू नये यासाठी हे सर्व केलं जातंय. त्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकताय आणि आम्हाला त्या ट्रॅपमध्ये अडकायचं नाहीये. आम्ही फक्त महागाईवर बोलणार… ते कुठेही जाऊदेत आम्हाला काही करायचं नाही… मात्र एक लक्षात ठेवा लोकं आज ‘श्रीराम’ म्हणतायत… महागाई इतकी वाढू देऊ नका की त्यांना ‘राम नाम सत्य’ आहे म्हणावं लागेल, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

तुमचं घर कुठं चाललंय ते बघा

हेच नको ते विषय पुढे नेण्याचा प्रयत्न होतोय… मला महागाईवर विचारलात आणि पोचलात अयोध्येत… असे पत्रकारांना सुनावतानाच तुम्हालाही चिंता नाही भाव कुठे जात आहेत त्याची… पगार कसे आहेत… आपल्या नोकर्‍या राहणार आहेत की नाही…चॅनेल चालणार आहेत की नाही… किती पेपर बंद पडले आणि किती सुरु आहेत याची कुणालाही चिंता नाही. मात्र ते अयोध्येला जात आहेत… अहो जाऊ द्या ना, तुमचं घर कुठं चाललंय ते बघा…असा सबुरीचा सल्लाही त्यांनी दिला.

महागाईचा दर 14 टक्क्यांवर पोचला

महागाईचा दर 14 टक्क्यांवर पोचला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने यावर चर्चा करायला हवी. पण तुम्हा लोकांना सवय लागलीय नको त्या विषयांना नको त्या विषयांकडे घेऊन जायचं, असंही त्यांनी सुनावले.

संबंधित बातम्या:

Jitendra Awhad on inflation: उन्हाचा चटका कमी, महागाईचाच चटका जास्त बसतोय, महागाईवर काहीतरी बोला: जितेंद्र आव्हाड

Maharashtra News Live Update : गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालतीय कोठडी, तर जयश्री पाटलांना दिलासा

Jayant Patil: आपली ताकद प्रचंड आहे, आपण भिडलो तर विरोधकांचा टिकाव लागणार नाही: जयंत पाटील

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?