AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिष्यवृत्ती योजना लॉन्च, कॉलेज-विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मिळणार 20,000 पर्यंत आर्थिक मदत

उच्च शिक्षण विभागाच्या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ आहे. यासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल scholarships.gov.in ला भेट देऊन या शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

शिष्यवृत्ती योजना लॉन्च, कॉलेज-विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मिळणार 20,000 पर्यंत आर्थिक मदत
| Updated on: Jun 29, 2025 | 12:47 PM
Share

Central Sector scholarship: पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) कडून २०,००० रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती मिळू शकणार आहे. सीबीएसईने ही खास योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव ‘सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप फॉर कॉलेज अँड यूनिव्हर्सिटी स्टूडेंट्स (CSSS) आहे.

काय आहे योजना

सीबीएसईने एक नोटीस दिली आहे. त्यानुसार महाविद्यालय, विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु शकणार आहे. scholarships.gov.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या योजनेत पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या तीन वर्षांसाठी १२ हजार रुपये मिळणार आहे. त्यानंतर पदवीत्तर पदवीसाठी २० हजार रुपये मिळणार आहे. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च निघण्यासाठी ही मदत मिळणार आहे. ही शिष्यवृत्ती ईडब्लूएस (EWS) वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

असा करा अर्ज

उच्च शिक्षण विभागाच्या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ आहे. यासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल scholarships.gov.in ला भेट देऊन या शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. सीबीएसईच्या सूचनेनुसार, शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालय किंवा विद्यापीठातून त्यांचा अर्ज पडताळून घ्यावा लागणार आहे. विद्यार्थी पडताळणीमध्ये पात्रता निकष पूर्ण करत असेल तर अर्ज करू शकतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे महाविद्यालय किंवा विद्यापीठाला दाखवावी लागणार आहे. पडताळणी केल्याशिवाय अर्ज करता येणार नाही. महाविद्यालय आणि विद्यापीठातील नोडल अधिकाऱ्यांनी पडताळणीचे काम लवकर पूर्ण करावे, असे सीबीएसई बोर्डाने म्हटले आहे.

ही घ्या काळजी…

सीबीएसईने विद्यार्थ्यांना सल्ला देताना म्हटले आहे की, scholarships.gov.in वर दिलेल्या सूचनांचे पालन करुन अर्ज भरा. अर्जात कोणतीही चूक झाली तर अर्ज नाकारला जाऊ शकतो. यामुळे दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज भरा.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.