CBSE Compartment Exam: सीबीएसईकडून कंपार्टमेंट परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, परीक्षा ‘या’ तारखेपासून सुरु

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डानं कंपार्टमेंट परीक्षा 2021 ची डेटशीट जाहीर केली आहे. श्रेणी सुधार, कंपार्टमेंट, खासगी आणि पत्राद्वारे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं वेळापत्रक  सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर अपलोड केलं गेलं आहे.

CBSE Compartment Exam: सीबीएसईकडून कंपार्टमेंट परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, परीक्षा 'या' तारखेपासून सुरु
सीबीएसई
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 10:29 AM

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डानं कंपार्टमेंट परीक्षा 2021 ची डेटशीट जाहीर केली आहे. श्रेणी सुधार, कंपार्टमेंट, खासगी आणि पत्राद्वारे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं वेळापत्रक  सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर अपलोड केलं गेलं आहे. सीबीएसईने बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 29 जुलै रोजी आणि 10 वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 3 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर केला होता. सीबीएसईच्या नव्या घोषणेनुसार कंपार्टमेंट परीक्षा 25 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

कंपार्टमेंट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सीबीएसईची कंपार्टमेंट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 88 टक्के घटली आहे. दहावीसाठी 17 हजार 636 विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट परीक्षेसाठी निश्चित करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी ही संख्या 1.5 लाखांपेक्षा अधिक होती. कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल 30 सप्टेंबर नंतर जाहीर केला जाणार आहे.

पर्यायी मूल्यांकनावर असमाधानी विद्यार्थ्यांसाठी संधी

पर्यायी मूल्यांकनाद्वारे तयार करण्यात आलेल्या निकालावर जे विद्यार्थी समाधानी नाहीत ते बोर्डाकडून घेण्यात कंपार्टमेंट परीक्षेला उपस्थित राहू शकतात. बोर्ड 10 वी आणि 12 वी साठी 25 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2021 पर्यंत श्रेणी सुधारणा आणि कंपार्टमेंट परीक्षा घेईल. कंपार्टमेंट आणि श्रेणी सुधारणा परीक्षा देश आणि परदेशातील नियुक्त केंद्रांवर घेतली जाणार आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे.

10th Comparment

10th Compartment

नोंदणी सुरु

सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोरोना विषाणू संसर्गामुळं रद्द करण्यात आल्या होत्या. पर्यायी मूल्यांकनानुसार निकाल जाहीर करण्यात आले आहेत. श्रेणी सुधारण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसांठी नोंदणी प्रक्रिया 10 ऑगस्टपासून सुरु झाल्या आहेत. केवळ 19 विषयांचे पेपर आयोजित केले जाणार आहेत.

12th Compartment

12th Compartment

सीबीएसईचा बारावीचा निकाल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 29 जुलै रोजी सीबीएसई 12 वीचा निकाल 2021 जाहीर केला आहे. यंदा सीबीएसई 12 वीचा निकाल 99.37 टक्के लागला आहे. या वर्षी 99.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. मुलींचा निकाल 99.67 टक्के आहे, तर मुलांचा निकाल 99.13 टक्के आहे.

इतर बातम्या:

CBSE 10th Result 2021Declared: सीबीएसईचा दहावीचा निकाल कसा आणि कुठे पाहायचा? वाचा सविस्तर

CBSE class 12th Result : सीबीएसईचा बारावीच्या निकालावर असमाधानी विद्यार्थ्यांना दिलासा, ऑफलाईन परीक्षेची घोषणा

CBSE released Class 10 and 12 Compartment and Improvement Exams Date sheet check here details

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.