AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CUET 2022 च्या रजिस्ट्रेशन तारखेत बदल… कधीपर्यंत आहे अंतिम मुदत?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येत असलेल्या कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षेच्या रजिस्ट्रेशन तारखेत बदल करण्यात आला आहे. अद्याप परीक्षेच्या तारखेबद्दल कुठलीही माहिती देण्यात आलेली नसली तरी प्रवेश परीक्षेत वारंवार होत असलेल्या बदलामुळे विद्यार्थीं काहीसे गोंधळलेले दिसत आहेत.

CUET 2022 च्या रजिस्ट्रेशन तारखेत बदल... कधीपर्यंत आहे अंतिम मुदत?
CUET 2022 च्या रजिस्ट्रेशन तारखेत बदलImage Credit source: TV9
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Apr 06, 2022 | 11:33 PM
Share

नवी दिल्लीः नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) कॉमन युनिव्हर्सिटी परीक्षेसाठी (CUET 2022) घेण्यात येत असलेल्या प्रवेश परीक्षेच्या रजिस्ट्रेशनच्या तारखेत बदल केला आहे. एनटीएच्या वेबसाईटवर nta.ac.in याबाबत सुचना देण्यात आली असून त्यानुसार, कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षसाठी प्रवेश अर्ज 6 एप्रिलपासून स्वीकारले जाणार आहे. इच्छूक विद्यार्थींनी CUET परीक्षेसाठी अधिकृत वेबसाइटवर जाउन अर्ज करावयाचे आहे. विद्यार्थीं आता 6 मेपर्यंत अर्ज प्रक्रिया करु शकणार आहेत. याआधी CUET साठी रजिस्ट्रशेनची मुदत 2 एप्रिलपासून सुरु होणे अपेक्षीत हेाते. परंतु काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने CUET च्या प्रवेश परीक्षेच्या तारखेत हा बदल (Change) असून या बदलाची माहिती विद्यार्थींना देण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.

दरम्यान, अद्याप CUCET च्या परीक्षेची तारीख निश्‍चित झाली नसली तरी, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने CUET 2022 च्या तारखेत बदल केला तेव्हा याची माहिती विद्यार्थींना देण्यात आल्याचे म्हटले आहे. CUCET ची परीक्षा साधारणत: जुलैच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात घेणे अपेक्षीत आहे. दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून CUET च्या परीक्षेमध्ये वारंवार बदल करण्यात येत असल्याने ही एजन्सी परीक्षा घेण्यास सक्षम आहे की, नाही याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, CUET सुरु करण्यामागे महत्वाचे कारण होते ते म्हणजे, विविध राज्यांमधील वेगवेगळे बार्ड परीक्षांची पध्दत. तसेच प्रत्येक बोर्डाकडून देण्यात येत असलेल्या नंबरमध्येही बराच फरक आहे. यात CUET एक गेमचेंजर ठरु शकतो असा विश्‍वास व्यक्त होत आहे. याचे एखादी उदाहरणच बघायचे झाल्यास, सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेमध्ये साधारणत: 80 हजार विद्यार्थीं 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवतात. प्रवेश परीक्षेचे कटऑफ देखील बरेच जास्त असते. त्यामुळे याचा फटका इतर स्टेट बोर्डाच्या विद्यार्थींना सहन करावा लागत असतो. त्यामुळेच CUET ला या सर्व समस्यांवर तोडग्याच्या रुपात पाहिले जात आहे.

असा करा अर्ज

1) CUET किंवा NTA च्या वेबसाईटवर जावे. 2) पृष्ठभागावर CUET 2022 नोंदणी लिंकवर क्लिक करा. 3) स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल. 4) त्यावर आपली नोंदणी करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. 5) आवश्‍यक ते सर्व कागदपत्र अपलोड करुन सबमिट करा. 6) अर्जाची एक प्रिंट काढून घ्या.

या चार सेक्शनचा असेल सहभाग

सेक्शन lA : 13 भाषा

सेक्शन lB : 20 भाषा

सेक्शन ll : 27 डोमेन स्पेसिफिक सब्जेक्ट

सेक्शन lll : सामन्या परिक्षा

संबंधित बातम्या

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवेच्या 687 जागांसाठी भरती प्रक्रिया… ही आहे शेवटची तारीख

PG प्रोग्रामसाठी प्रवेश प्रकियेला सुरुवात… पात्रता व महत्वाच्या तारखा जाणून घ्या

UGC आता घेऊन येत आहे नवीन नियम, प्राध्यापक बनण्यासाठी आता PhD, NET ची गरज नाही

Follow Us
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी