COEP पुणे ने प्रवेशाच्या जागा वाढविल्या! सविस्तर माहिती वाचा

गेल्या वर्षीच्या तुलनेत या जागा 25 टक्के जास्त असणारेत. जेईई मेन्स 2022 च्या स्कोअरच्या आधारे या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणारे.

COEP पुणे ने प्रवेशाच्या जागा वाढविल्या! सविस्तर माहिती वाचा
COEP PuneImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 27, 2022 | 3:24 PM

विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी! पुण्यातील सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी म्हणजेच कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगने 25 टक्के जास्त जागा वाढविल्या आहेत. बी टेक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी या जागा वाढविल्यात. गेल्या वर्षीच्या तुलनेत या जागा 25 टक्के जास्त असणारेत. जेईई मेन्स 2022 च्या स्कोअरच्या आधारे या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणारे. विद्यापीठात फक्त पदवी स्तरावरील अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. एमटेक किंवा इतर मास्टर्स अभ्यासक्रमांना गेल्या वर्षीएवढ्याच जागा आहेत. प्रवेश घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण माहिती वेबसाइटवर पाहावी- coep.org.in.

या अभ्यासक्रमांच्या जागा वाढविल्या

  1. सिव्हील इंजिनिअरिंग/ गेल्या वर्षीच्या जागा- 60/ यंदाच्या जागा- 75
  2. मेकॅनिकल इंजिनिअरिंग/ गेल्या वर्षीच्या जागा- 120/ यंदाच्या जागा- 150
  3. विद्युत अभियांत्रिकी/ गेल्या वर्षीच्या जागा- 60/ यंदाच्या जागा- 75
  4. इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजिनिअरिंग/ गेल्या वर्षीच्या जागा- 60/ यंदाच्या जागा- 75
  5. मटेरियल्स टेक्नॉलॉजी/ गेल्या वर्षीच्या जागा- 60/ यंदाच्या जागा- 75
  6. इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनिअरिंग/ गेल्या वर्षीच्या जागा- 30/ यंदाच्या जागा- 38
  7. कंप्यूटर इंजिनिअरिंग/ गेल्या वर्षीच्या जागा- 120/ यंदाच्या जागा- 150
  8. बी प्लानिंग/ गेल्या वर्षीच्या जागा- 60/ यंदाच्या जागा- 75
  9. एमएस इंजिनिअरिंग/ गेल्या वर्षीच्या जागा- 60/ यंदाच्या जागा- 75

सीओईपी पुणे येथील प्रवेश प्रक्रिया ही सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅपद्वारे केली जाते. विद्यापीठाचे संचालक मुकुल सुताने यांच्या माहितीनुसार, यंदा विद्यापीठाने यूजी लेव्हलच्या सर्व जागा वाढवल्या आहेत.

विद्यापीठाने जारी केलेल्या अधिसूचनेत फक्त यूजी स्तरावरील अभ्यासक्रमांच्या जागा वाढवून देण्यात आल्या आहेत.

गेल्या वर्षी एमटेकसाठी 486 जागा होत्या. त्याचबरोबर एम प्लॅनिंगसाठी 31 आणि एमबीएसाठी 30 जागा होत्या. यंदा एमटेक, एमप्लॅनिंग आणि एमबीएच्या जागा वाढलेल्या नाहीत. गेल्या वर्षीप्रमाणेच या अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.