Career News : बारावीनंतर पुढं काय? पर्यटन क्षेत्रातील अभ्यासक्रम आणि संधी

भारताला सर्वात मोठी प्राकृतिक विविधता लाभलेली आहे. भारतामध्ये पर्यटन क्षेत्राला मोठा वाव आहे. देशातील प्रत्येक राज्य पर्यटनाच्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टींसाठी ओळखलं. महाराष्ट्र राज्यात देखील पर्यटनाला मोठा वाव आहे.

Career News : बारावीनंतर पुढं काय? पर्यटन क्षेत्रातील अभ्यासक्रम आणि संधी
प्रतिकात्मक फोटो

मुंबई: भारताला सर्वात मोठी प्राकृतिक विविधता लाभलेली आहे. भारतामध्ये पर्यटन क्षेत्राला मोठा वाव आहे. देशातील प्रत्येक राज्य पर्यटनाच्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टींसाठी ओळखलं. महाराष्ट्र राज्यात देखील पर्यटनाला मोठा वाव आहे. अरबी समुद्राची कोकण किनारपट्टी, छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले, मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, अजंठा वेरुळच्या लेण्या, लोणार सरोवर, थंड हवेची ठिकाण असं पर्यटनाचं मोठं क्षेत्र महाराष्ट्रात आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पर्यटन क्षेत्राकडं करिअर म्हणून पाहिल्यास नवनव्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

बारावीनंतरचे पर्यटन क्षेत्रातील अभ्यासक्रम

बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पर्यटन क्षेत्रातील विविध पदवी अभ्यासक्रांना प्रवेश घेऊ शकतात.तर, या क्षेत्रात पदविका अभ्यासक्रम करुन देखील रोजगाराच्या नोकरीच्या संधी मिळवू शकतात. बी.ए. इन ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट, बी.एससी इन ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट, बीबीए इन ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट, बीए टुरिझम स्टडीज, बीए इन ट्रॅव्हल अँड टुरिझम, सर्टिफिकेट कोर्स इन ट्रॅव्हल अँड टुरिझम, एअरफेअर अँड टुरिझम, बॅचलर ऑफ टुरिझम अॅडमिनिस्ट्रेशन, एमबीए इन टुरिझम, हॉस्पिटलिटी अँड एव्हिएशन प्रोग्राम

महाराष्ट्रात अभ्यासक्रम कुठे उपलब्ध?

आयएचम मुंबई, इनस्पायर अकॅडमी, मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, सिम्बॉयसिस पुणे, झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च, मुंबई विद्यापीठ, एमआयटी, पुणे याठिकाणी महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रातील अभ्यासक्रम चालवले जातात.

अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच्या करिअर संधी

पर्यटन क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी गाईड म्हणून देखील काम करु शकतात. याशिवाय कोक्स अँड किंग्ज लिमिटेड, थॉमस कुक इंडिया लिमिटेड, मेक माय ट्रिप, यात्रा, क्लिअर ट्रिप यासारख्या कंपन्यांमध्ये किंवा टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांमध्ये टूर ऑर्गनायझर म्हणून काम करु शकतात.

पर्यटन क्षेत्रातील करिअर संधी

पर्यटनातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी राज्य आणि केंद्र सरकारच्या पर्यटन संचलनालय विभागात स्पर्धा परीक्षाद्वारे नोकरी मिळू शकते. खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये देखील नोकरी मिळू शकते. माहिती सहाय्यक, गाईड, टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजन्सी, हॉटेल क्षेत्र, विमान कंपन्या, वाहतूक सेवा इत्यादी क्षेत्रात नोकरी मिळू शकते.

इतर बातम्या:

Video : चुकीला माफी नाही, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्याच्या पाठीवर दणका! नेमकं कारण काय?

पवार ओबीसी, राज्यसभेतल्या गोंधळावर जगजाहीर बोलले, आता भाजपा म्हणते, तर आम्ही पोलखोल सभा घेऊ!

“शिवाजी महाराजांनी बुद्धी, शक्तीने राज्य केलं, मुलांनी तानाजी मालुसरे व्हावं,” सिंहगड सर केल्यानंतर राज्यपालांचे उद्गार

Published On - 8:02 am, Tue, 17 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI