CUET UG 2022: विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट प्रतिसादानंतर तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय! हरी अप पोरांनो…

CUET UG 2022: विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट प्रतिसादानंतर तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय! हरी अप पोरांनो...
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशात मोठा बदल

या परीक्षेसाठी आधीच ज्या उमेदवारांनी आपली नोंदणी केली आहे आणि नोंदणी करून सुद्धा जे नोंदणीकृत उमेदवार आपला अर्ज सादर करण्यास किंवा पूर्ण करण्यास असक्षम होते ते आता आपला अर्ज पूर्ण करू शकतात. अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्ज क्रमांक आणि संकेतशब्द वापरून लॉग इन करता येऊ शकतं.

रचना भोंडवे

|

May 29, 2022 | 11:20 AM

नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (Common University Entrance Test) म्हणजेच सीयूईटी यूजी 2022 (CUET UG 2022) साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढे ढकलली आहे. आता विद्यार्थी 31 मे रोजी रात्री 9 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. अधिकृत सूचनेनुसार, सीयूईटी यूजी 2022 साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांकडून मिळालेला उत्कृष्ट प्रतिसाद लक्षात घेता, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेसाठी आधीच ज्या उमेदवारांनी आपली नोंदणी केली आहे आणि नोंदणी करून सुद्धा जे नोंदणीकृत उमेदवार आपला अर्ज सादर करण्यास किंवा पूर्ण करण्यास असक्षम होते ते आता आपला अर्ज पूर्ण करू शकतात. अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्ज क्रमांक आणि संकेतशब्द वापरून लॉग इन करता येऊ शकतं.

डीम्ड विद्यापीठेही सीयूईटीद्वारे देणार प्रवेश

सीयूईटीच्या माध्यमातून देशभरातील केंद्रीय विद्यापीठांमध्ये ग्रॅज्युएशन म्हणजेच यूजी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर काही डीम्ड विद्यापीठेही त्याद्वारे प्रवेश देतील. विशेष म्हणजे यावेळी दिल्ली विद्यापीठ, जेएनयू आणि बीएचयूसह अलाहाबाद विद्यापीठात सीयूईटीच्या माध्यमातून प्रवेश देण्यात येणार आहे.

असा करा अर्ज

  • सर्वप्रथम cuet.samarth.ac.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • त्यानंतर सीयूईटी यूजी 2022 लिंकवर क्लिक करा.
  • एक नवीन विंडो उघडेल.
  • आवश्यक तो तपशील भरा.
  • सीयूईटी यूजी 2022 फॉर्म भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

13 भाषांमध्ये घेतली जाईल CUET UG

CUET UG चा परीक्षा पॅटर्न आधीच प्रसिद्ध झाला आहे. परीक्षा पद्धतीनुसार, परीक्षा 13 भाषांमध्ये घेतली जाईल. CUET PG साठी अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण हाच पॅटर्न पीजीसाठी वापरला जाईल, अशी अट आहे. मात्र यासाठी अधिकृत घोषणा होणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

CUET UG PG दोन्ही परीक्षा एकाच वेळी घेण्याची शक्यता

दरम्यान, परीक्षेच्या तारखेबद्दल अद्याप स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. PG CUET ची परीक्षाही जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाईल. UG च्या परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र आता पीजीसाठी CUET जाहीर झाल्यानंतर दोन्ही परीक्षा एकाच वेळी घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें