Mumbai | मुंबईत तब्बल 269 शाळा अनधिकृत, लाखो मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात!

शाळा प्रशासानाने महापालिकेच्या नोटीसला केराची टोपली दाखवली आहे. मुंबईतील अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत

Mumbai | मुंबईत तब्बल 269 शाळा अनधिकृत, लाखो मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात!
धक्कादायक आकडेवारीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 11:49 AM

मुंबई : संपूर्ण राज्यामध्ये सध्या अनधिकृत शाळांचे (School) पेव फुटले असून यामध्ये आता मुंबई शहरही मागे नसल्याचे आकडेवारीवरून पुढे आले आहे. संपूर्ण राज्यभरामध्ये 674 शाळा अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. तर त्यामध्ये 269 शाळा या फक्त मुंबईमधील (Mumbai) असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शासनाची कोणतीही परवानगी न घेता या शाळा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक होत असून या शाळांवर कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरामधून केली जात आहे. मुंबई महापालिकेची मान्यता न घेता मुंबईत तब्बल 269 अनधिकृत शाळा सुरु असल्याची धक्कादायक (Shocking) माहिती पुढे आल्यापासून पालकांनी चांगलीच धस्ती घेतली आहे.

मुंबईत 269 शाळा अनधिकृत

विशेष म्हणजे या सर्व शाळांना महापालिकेने वारंवार नोटीसही पाठवली आहे. मात्र, शाळा प्रशासानाने महापालिकेच्या नोटीसला केराची टोपली दाखवली आहे. मुंबईतील अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत. आता मुंबईतील या अनधिकृत शाळांवर राज्य सरकार नेमकी काय कारवाई करते हे पाहण्यासारखेच ठरणार आहे. मुंबईत नवीन शाळा सुरु करण्याआधी नियमानुसार पालिकेच्या शिक्षण विभागाची परवानगी बंधनकारक आहे, मात्र, 269 शाळांनी महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे दिसून आले.

Video : ठिणगीमुळे चार घरं पेटली, संसाराची राखरांगोळी!

हे सुद्धा वाचा

महापालिकेच्या नोटीसला केराची टोपली

अनधिकृत शाळांसंदर्भात एक महत्वाची माहिती देखील पुढे आली असून 269 पैकी काही शाळा या गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहेत. मुंबईतील अनधिकृत शाळांना मुंबई महापालिका वारंवार नोटीस बजावते. मात्र, महापालिकेच्या नोटीसला कुठल्याही प्रकारची दाद ही शाळेंकडून देण्यात आली नाहीये. नोटीस बजावण्यात आलेल्या शाळांची यादी दरवर्षी राज्य सरकारकडे पाठवण्यात येते.

मात्र अशा शाळांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे असल्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कोणत्याच प्रकारची कारवाई या शाळेंवर करता येत नाही. महापालिका प्रशासन फक्त या शाळेंना नोटीसच देऊ शकते.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.