ऐतिहासिक निर्णय! सर्व सैनिक स्कूलमध्ये मुलींना प्रवेश मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय

2021-22 या शैक्षणिक वर्षापासून सर्व सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश दिला जाणार आहे. Girl student Sainik School

ऐतिहासिक निर्णय! सर्व सैनिक स्कूलमध्ये मुलींना प्रवेश मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व सैनिक स्कूलमध्ये मुलींना प्रवेश
| Updated on: Mar 12, 2021 | 12:47 PM

नवी दिल्ली: सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. देशातील सर्व सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्यात येणार आहेत. 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून सर्व सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश दिला जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे. सैनिकी शाळा सैनिक स्कूल सोसायटीमार्फत  चालवल्या जातात. संरक्षण मंत्रालयाचं सैनिक स्कूल सोसायटीवर संरक्षण मंत्रालयाचं नियंत्रण असते. सैनिकी शाळांमध्ये स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत हा महत्वाचा निर्णय आहे, असं केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.सैन्यामध्ये भरती होण्यासाठी मुलांमध्ये विशेष वातावरण तयार करणं हा त्याचा उद्देश होता. सद्यपरिस्थितीत देशात 28 सैनिक स्कूल आहेत. (Defence state Minister Shripad Naik announced Girl students can take admission in all Sainik Schools in Nation)

श्रीपाद नाईक काय म्हणाले?

सैनिकी शाळांमध्ये दोन वर्षांपूर्वी मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सैनिक स्कूल छंगछी, मिझोरम येथे शैक्षणिक सत्र 2018-19 मध्ये मुलींना प्रवेश देण्यात आला होता. आता 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्यात येणार आहेत, असं श्रीपाद नाईक म्हणाले. पहिलं सैनिक स्कूल महाराष्ट्रातील सातारा येथे स्थापन झालं होते.

देशात 100 सैनिक स्कूल सुरु होणार

केंद्र सरकार देशभरात 100 सैनिक स्कूल स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन येत आहे. सैनिक स्कूल सोसायटीवर याबाबत जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सैनिक स्कूल सोसायटीकडे संलग्नता प्रस्तावांना मंजुरी देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ज्या सैनिक स्कूल प्राथमिक व्यवस्था, गुणवत्ता आणि निकष पूर्ण करतील त्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात येतील. सैनिक स्कूल सोसायटी ही संलग्नता प्रक्रियेतील महत्वाची संस्था असेल. त्यांच्याकडून सलंग्नता प्रस्ताव मंजूर केले जातील, अशी सूत्रांची माहिती आहे.

सैनिक स्कूल मंजुरीचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात

संलग्नता प्रस्तावांना मंजूर देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवले जातील. याबाबत प्रक्रिया ठरवण्यात येत आहे.संसदेत सरकारनं बुधवारी सैनिक स्कूलबाबत महत्वाची घोषणा केली. सरकारी संघटना, खासगी संस्था आणि राज्य सरकारांच्या सहकार्यानं देशभरात सैनिक स्कूलची स्थापना केली जाणार आहे. केंद्र सरकार याबाबत योजना तयार करत आहे.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपद नाईक यांनी खासदार कूपनाथ मल्लाह आणि इतर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत उत्तर देत होते. श्रीपाद नाईक यांनी यावेळी सैनिक स्कूल सरकारी संस्था, खासगी संस्था आणि गैरशासकीय संस्था यांच्याशी संलग्नित करुन चालवल्या जातील, असं म्हटलं. तर सीबीएसईच्या अभ्यासक्रमानुसार शिक्षणाची संधी उपलब्ध करुन द्यायची आहे. सैनिक स्कूलच्या शिक्षणद्वारे राष्ट्रप्रेम वाढवणार शिक्षण दिलं जाईल, असं ते म्हणाले. नव्या सैनिकी शाळा सैनिक स्कूल सोसायटीसोबत जोडल्या जातील. याबाबत मार्गदर्शक सूचना बनवल्या जात आहेत, अशी माहिती नाईक यांनी दिली.


संबंधित बातम्या:

देशात100 सैनिक स्कूल सुरु होणार, खासगी क्षेत्राचाही समावेश, केंद्राचा मोठा निर्णय

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारचे महत्त्वाचे पाऊल, 12 विषयांचे 120 ग्राफिक कॉमिक्स बुकचे प्रकाशन

(Defence state Minister Shripad Naik announced Girl students can take admission in all Sainik Schools in Nation)