Delhi School News: नवी दिल्लीतील सगळ्या शाळा बंद राहणार, सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर केजरीवाल सरकारचा निर्णय

राजधानी नवी दिल्लीतील शाळा (Delhi School News) पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सरकारनं घेतला आहे.

Delhi School News: नवी दिल्लीतील सगळ्या शाळा बंद राहणार, सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर केजरीवाल सरकारचा निर्णय
school student

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतील शाळा (Delhi School News) पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सरकारनं घेतला आहे. नवी दिल्लीतील प्रदूषण (Pollution) वाढल्यानं शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढावली आहे. प्रदूषणाच्या मुद्यावरुन आणि अशा परिस्थितीमध्येही शाळा सुरु ठेवल्यावरुन सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) केजरीवाल सरकारला फटकारलं होतं. अखेर नवी दिल्लीमधील शाळा उद्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रदूषणामुळं शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

नवी दिल्लीतील सगळ्या शाळा बंद करण्यात येणार आहेत. प्रदूषणामुळे पुन्हा एकदा नवी दिल्लीच्या शाळा बंद राहणार आहेत. पुढचा आदेश येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली आणि NCR मध्ये प्रदूषणाचा पुन्हा कहर

नवी दिल्ली आणि एनसीआरमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाचा कहर वाढलेला आहे. वाढत्या प्रदूषणामुळं मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून नवी दिल्लीतील सरकारनं शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टानं प्रदूषणाच्या मुद्यावर नवी दिल्ली सरकारला फटकारलं होतं.

सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, मग शाळा का सुरु

नवी दिल्लीतील सरकारी कर्मचाऱ्यांना प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास परवानगी देण्यात आली होती. मग, शाळा का सुरु ठेवण्यात येत आहेत, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. अखेर केजरावील सरकारला सुप्रीम कोर्टानं आज फटकारल्यानंतर शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर फेरविचार होणार?

महाराष्ट्रात 1 डिसेंबरपासून शाळा सुरु झाल्या आहेत. शहरी भागात काही ठिकाणी 10 किंवा 15 तारखेपासून शाळा सुरु होणार आहेत. शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला तेव्हा ओमिक्रॉनची परिस्थिती निर्माण झाली नव्हती. मात्र, आता ओमिक्रॉनचं संकट निर्माण झाल्यानं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ओमिक्रॉनमुळं निर्माण झालेल्या परिस्थितीत महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा फेरविचार केला जाणार का हे पाहावं लागणार आहे.

इतर बातम्या:

CBSE : गुजरातमध्ये कोणत्या सरकारच्या काळात 2002 मध्ये मुस्लीम विरोधी हिंसा झाली? वादग्रस्त प्रश्नावर सीबीएसईचा माफिनामा

IIT मध्ये कॅम्पस प्लेसमेंटला सुरुवात, पहिल्याच दिवशी आयआटी मुंबईच्या विद्यार्थ्याला 2 कोटींचं पॅकेज

Delhi School News kejriwal government decided to close school due to pollution after criticism of Supreme Court

Published On - 1:37 pm, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI