AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diploma Course: 12वी नंतर IT सेक्टर मध्ये करा ‘हे’ डिप्लोमा कोर्स, पटकन नोकरी!

बारावी पाससाठी अनेक पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे कोर्स केल्यानंतर लाखो नोकऱ्या सहज मिळू शकतात. IT  कंपन्या आयटी क्षेत्र आणि संगणक क्षेत्रातील पदविकाधारकांना मोठ्या पॅकेजवर नियुक्त करत आहेत. हे अभ्यासक्रमही अनेक अव्वल संस्थांकडून दिले जातात.

Diploma Course: 12वी नंतर IT सेक्टर मध्ये करा 'हे' डिप्लोमा कोर्स, पटकन नोकरी!
Diploma courses after 12th
| Updated on: Jun 10, 2023 | 1:54 PM
Share

मुंबई: आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा शिगेला पोहोचली असताना स्मार्ट वर्कर्सची मागणीही झपाट्याने वाढत आहे. कमी वेळात अधिक डिमांडिंग कोर्स करून लवकरात लवकर प्लेसमेंट मिळावी अशी बहुतेकांची इच्छा असते. बारावी पाससाठी अनेक पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे कोर्स केल्यानंतर लाखो नोकऱ्या सहज मिळू शकतात. IT  कंपन्या आयटी क्षेत्र आणि संगणक क्षेत्रातील पदविकाधारकांना मोठ्या पॅकेजवर नियुक्त करत आहेत. हे अभ्यासक्रमही अनेक अव्वल संस्थांकडून दिले जातात. चला जाणून घेऊया या कोर्सेसबद्दल.

ॲनिमेशन आणि VFX कोर्स

जर तुम्ही बारावी पास असाल आणि तुम्ही क्रिएटिव्ह असाल तर तुम्ही शॉर्ट टर्म कोर्स किंवा डिप्लोमा प्रोग्राम म्हणून ॲनिमेशन आणि व्हीएफएक्स निवडू शकता. न्यूज चॅनल्सपासून ते बिग बजेट चित्रपटांसाठी ॲनिमेशनचा वापर केला जातो. अशा तऱ्हेने या क्षेत्रात उत्तम कौशल्य असणाऱ्यांना कोट्यवधींच्या पॅकेजवर कामावर घेतले जाते. हा अभ्यासक्रम 1 वर्षाचा आहे.

डेटा सायन्स कोर्स

जगभरातून मोठ्या प्रमाणात डेटा चे उत्पादन होत असल्याने डेटा विश्लेषकांची मागणी झपाट्याने वाढली आहे. डेटा सायन्स डिप्लोमा प्रोग्राम अनेक नामांकित संस्थांद्वारे आयोजित केला जातो. प्रोग्रॅमिंग लँग्वेज आणि स्टॅटिस्टिक्स शिकण्याची संधी आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला खालील पोस्टवर काम करण्याची संधी मिळते-

  • डेटा वैज्ञानिक/ Data Scientists
  • डेटा ॲनालिस्ट/ Data Analyst
  • डेटा इंजीनियर/ Data Engineer
  • बिजनेस इंटेलिजेंस ॲनालिस्ट/ Business Intelligence Analyst
  • विपणन विश्लेषक/ Marketing Analyst

मोबाइल ॲप्लिकेशन्स डेव्हलपमेंट

हे मोबाईल फोनचे युग आहे. हल्ली मोबाईल फोन आणि त्याच्या ॲप्लिकेशन्सचा वापर झपाट्याने वाढला आहे. ॲप डेव्हलपमेंटच्या ट्रेंडमुळे मोबाइल ॲप्लिकेशन्स आणि त्याच्या डेव्हलपमेंटला मोठी मागणी निर्माण झाली आहे. या क्षेत्रातील बारावीनंतरच्या अल्पमुदतीच्या पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी 6 महिन्यांचा आहे. हा कोर्स केल्यानंतर ॲप्लिकेशन डिझायनर, ॲप्लिकेशन डेव्हलपर आणि ॲप टेस्टर अशा पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.