AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GATE Exam 2022 : गेट परीक्षेच्या नोंदणीला मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत नोंदणीची संधी

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूरने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. उमेदवारांनी गेट परीक्षेची अधिकृत नोटिफिकेशन वाचल्याशिवाय अर्ज करु नये, असं आवाहन करण्यात आलंय.

GATE Exam 2022 : गेट परीक्षेच्या नोंदणीला मुदतवाढ, आता 'या' तारखेपर्यंत नोंदणीची संधी
GATE 2022
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Sep 24, 2021 | 3:20 PM
Share

GATE Exam 2022 नवी दिल्ली : अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या गेट 2022 परीक्षेची नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी  28 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करु शकतात. अभियांत्रिकी पदवी परीक्षा (GATE) 2022 साठी नोंदणी gate.iitkgp.ac.in या वेबसाईटवर करण्यात येईल. गेट परीक्षा जे विद्यार्थी देऊ इच्छितात ते आयआयटी खरगपूरच्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकतात. तर गेट परीक्षा 2022 मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. परीक्षा अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढील माहितीसाठी गेटच्या वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे.

आयआटी खरगपूरकडे गेट आयोजनाची जबाबदारी

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूरने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक  28 सप्टेंबर करण्यात आला आहे.   उमेदवारांनी गेट परीक्षेची अधिकृत नोटिफिकेशन वाचल्याशिवाय अर्ज करु नये, असं आवाहन करण्यात आलंय. गेट 2022 साठी नवीन वेबसाईटवर सविस्तर नोटिफिकेशन आयआयटी खरगपूरकडून जारी करण्यात आलं आहे. तसेच, GATE 2022 च्या परीक्षेची व्याप्ती वाढवण्यात आलीय. BDS आणि M. Pharm पदवी असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर 2021 विलंब शुल्कासह अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑक्टोबर 2021 अर्जामध्ये सुधारणा – 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 श्रेणी आणि परीक्षेचे शहर बदलण्याची शेवटची तारीख – 3 जानेवारी 2022 GATE परीक्षेच्या प्रस्तावित तारखा – 5, 6, 12 आणि 13 फेब्रुवारी 2022 निकाल जाहीर होण्याची तात्पुरती तारीख – 17 मार्च 2022

नोंदणी कशी करावी?

गेट 2022 नोंदणीची प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करावी लागेल. GATE 2022 च्या माहितीसाठी gate.iitkgp.ac.in वर भेट द्यावी लागेल.  विद्यार्थी गेट परीक्षेच्या एक किंवा दोन पेपरसाठी अर्ज करू शकतात. परंतु, अर्ज फक्त एकच भरावा लागणार आहे. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरले असतील तर त्यापैकी फक्त एक स्वीकारला जाईल इतर बाकीचे रद्द केले जातील. मात्र, त्यांचे शुल्क देखील परत केले जाणार नाही.

नोंदणी शुल्क

एससी, एसटी, दिव्यांग आणि सर्व महिला उमेदवारांसाठी गेट अर्ज शुल्क : 750 रुपये लेट फीसह: 1250 रुपये इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज फी : 1500 रुपये विलंब फीसह 2000 रुपये

परीक्षा कधी होणार?

GATE 2022 परीक्षा 05 फेब्रुवारी, 06 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी आणि 13 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात येईल.आयआयटी खरगपूरने कोरोना विषाणू संसर्गामुळं परीक्षांच्या तारखा बदलल्या जाऊ शकतात.

गेट परीक्षा नेमकी काय?

आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि सीएफटीआय संस्थांच्या एम.ई. / एम.टेक / पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गेट ही परीक्षा घेण्यात येते. देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (पीएसयू) भरतीसाठीही गेट स्कोअरचा वापर केला जातो. 2021 च्या गेट परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआटी मुंबईकडं देण्यात आली होती.

इतर बातम्या:

FYJC Admission : अकरावीसाठी पहिल्या यादीतील प्रवेशनिश्चितीची अखेरची संधी, दुसऱ्या फेरीची आज घोषणा

GATE Exam 2022 : गेट परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात, रजिस्ट्रेशनची प्रक्रिया नेमकी कशी? वाचा सविस्तर

GATE 2022 online application last date  extended by IIT Kharagpur check details at gate.iitkgp.ac.in

Follow Us
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...