ICSE Toppers 2022: विद्येच्या माहेरघराचा मान राखला, पुण्याचा भार्गव कोलापल्ले देशात तिसरा आला!

| Updated on: Jul 18, 2022 | 1:23 PM

या विद्यार्थ्याने 99.4 टक्के गुण मिळवून देशात तिसरा क्रमांक मिळवला आहे. मगरपट्टा सिटी पब्लिक स्कूलने स्थापनेपासूनच म्हणजेच मागील अठरा वर्षांपासून शंभर टक्के निकालाची परंपरा जपली आहे.

ICSE Toppers 2022: विद्येच्या माहेरघराचा मान राखला, पुण्याचा भार्गव कोलापल्ले देशात तिसरा आला!
Bhargav Kolapalle ICSE Topper Pune
Image Credit source: TV9 marathi
Follow us on

पुणे: पुण्याला शिक्षणाचं, विद्येचे माहेरघर म्हणून पाहिलं जातं. त्या पुण्यात शिकण्यासाठी जगभरातून विद्यार्थी येतात, फक्त भारतातूनच नाही तर विदेशातील विद्यार्थ्यांचा ओढा ही पुण्याकडे (Pune) असतो. कारण पुण्यातल्या शिक्षणाचा दर्जा तेवढा चांगला आहे. त्यामुळेच पुण्याने अनेक उज्वल विद्यार्थी घडवले आहेत. इतर निकालांप्रमाणेच यंदाच्या आयसीएसई दहावीच्या निकालात (ICSE 10th Results) सुद्धा पुण्याने चांगलंच नाव कमवलंय! आयसीएसई दहावी परीक्षेत, विद्या प्रतिष्ठानच्या मगरपट्टासिटी पब्लिक स्कूलच्या भार्गव कोलापल्ले (Bhargav Kolapalle ICSE Toppers) या विद्यार्थ्याने 99.4 टक्के गुण मिळवून देशात तिसरा क्रमांक मिळवला आहे. मगरपट्टा सिटी पब्लिक स्कूलने स्थापनेपासूनच म्हणजेच मागील अठरा वर्षांपासून शंभर टक्के निकालाची परंपरा जपली आहे.

3 विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकावर स्थान पटकावले

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) ने 17 जुलै रोजी ICSE 10वीचा निकाल जाहीर केला आहे. निकाल अधिकृत वेबसाइट cisce.org वर उपलब्ध आहे. विद्यार्थी आवश्यक माहिती भरून निकाल तपासू शकतात. यासोबतच बोर्डाने टॉपर्सची यादीही जाहीर केली आहे. परीक्षेत एकूण 99.97% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, ज्यामध्ये 3 विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकावर स्थान पटकावले आहे. ICSE इयत्ता 10वी परीक्षा 2022 मधील टॉपर्स हरगुन कौर मथारू, अनिका गुप्ता, पुष्कर त्रिपाठी आणि कनिष्क मित्तल आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी ICSE परीक्षेत 499 गुणांसह 99.80 टक्के गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. टॉपर हरगुन कौर मथारू ही महाराष्ट्रातील पुण्याची आहे. त्यामुळे पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

गेल्या पाच वर्षांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी

  1. 2021- 99.98 टक्के
  2. 2020- 99.33 टक्के
  3. 2019- 98.54 टक्के
  4. 2018- 98.51 टक्के
  5. 2017- 98.52 टक्के

70 हजार विद्यार्थांनी दिली परीक्षा

यंदा आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेसाठी 70 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ज्याचा निकाल आज वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. आता आयएससी 12 वीच्या विद्यार्थ्यांना आपल्या निकालाची प्रतीक्षा आहे. सीआयएससीई बोर्ड लवकरच हा निकालही जाहीर करेल. त्यामुळे बोर्डाच्या अधिकृत पेजवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे आहे. त्यामुळे पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.