GATE 2021 Counselling: गेट 2021 ची समुपदेशन प्रक्रिया सुरु, रजिस्ट्रेशन कसं करायचं?

GATE 2021 Counselling: गेट 2021 ची समुपदेशन प्रक्रिया सुरु, रजिस्ट्रेशन कसं करायचं?
गेट

आयआयटी दिल्ली यांच्याकडून गेट 2021 साठी समुपदेशन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. IIT Delhi GATE 2021 COAP

Yuvraj Jadhav

|

May 28, 2021 | 7:45 PM

GATE 2021 Counselling नवी दिल्ली: गेट 2021 चा निकाल जाहीर झाल्यानंतर इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), दिल्लीने आता अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाला सुरुवात केली आहे. यासाठी लिंक सुरु करण्यात आली आहे. GATE COAP साठी नोंदणी करण्याची प्रक्रिया 28 मे म्हणजेच आजपासून सुरु झाली आहे. ही प्रक्रिया 30 मे पर्यंत सुरु असेल. जे उमेदवार GATE 2021 परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत coap.iitd.ac.in वर अर्ज करु शकतात. हे विद्यार्थी गेट 2020 आणि गेट 2019 च्या समुपदेशनासाठी पात्र ठरतील. ( IIT Delhi active application link for counselling programme of GATE 2021 COAP )

समुपदेशनाचं वेळापत्रक

पहिली फेरी – 28 ते 30 मे 2021

दुसरी फेरी- 04 जून ते 06 जून, 2021

तिसरी फेरी- 11 जून ते 13 जून, 2021

चौथी फेरी- 18 जून ते 20 जून, 2021

पाचवी फेरी राउंड- 25 जून ते 27 जून, 2021

GATE 2021 समुपदेशनासाठी नोंदणी कशी कऱणार

गेट समुपदेशानासाठी रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया coap.iitd.ac.in या वेबसाईटवर सुरु आहे. सर्वप्रथम वेबसाईट वर भेट द्या. तिथे होमपेज वर, “रजिस्ट्रेशन लिंक” वर क्लिक करा. आवश्यक माहिती भरून नोंदणी करा. यानंतर लॉगीन करुन प्रक्रिया पूर्ण करा.

20 मार्च रोजी जाहीर झाला गेटचा निकाल

अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी (GATE 2021 Exam declared) परीक्षेचा निकाल 20 मार्च रोजी जाहीर करण्यात आला. गेट परीक्षेला एकूण 9 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी 75 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी 1 लाख 26 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेट परीक्षेत उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 17.82 टक्के एवढी आहे. आयआयटी बॉम्बेनं गेट परीक्षेचे आयोजन केले होते, त्यांनी गेट परीक्षेतील टॉपर्सची यादी जाहीर केली होती.

संबंधित बातम्या:

GATE 2021 score card : IIT बॉम्बेने स्कोअर कार्ड केले जारी, थेट लिंकवरून करा डाउनलोड

GATE 2021 Toppers List: गेट 2021 परीक्षेचा निकाल जाहीर, टॉपर्सची यादी इथे पाहा

IIT BOMBAY GATE 2021 Pass Percentage: गेट परीक्षेत 17.82 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, gate.iitb.ac.in वेबसाईटवर पाहा निकाल

( IIT Delhi active application link for counselling programme of GATE 2021 COAP )

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें