AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Independence Day: जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधानपदाची शपथ कोणी दिली? अशा अनेक रंजक गोष्टी ज्या तुम्हाला माहिती असायलाच हव्यात…जाणून घेऊ

अनेक रंजक गोष्टी आहेत ज्याची माहिती आपल्याला असायलाच हवी. आज आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य दिनाबद्दल अशा अनेक रंजक गोष्टी सांगत आहोत. चला जाणून घेऊया या दिवसाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे.

Independence Day: जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधानपदाची शपथ कोणी दिली? अशा अनेक रंजक गोष्टी ज्या तुम्हाला माहिती असायलाच हव्यात...जाणून घेऊ
75th Independence DayImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 15, 2022 | 11:14 AM
Share

75 वा स्वातंत्र्य दिन आज 15 ऑगस्ट 2022 : देश स्वातंत्र्य दिनाला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत. हा उत्सव स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावरून सलग नवव्यांदा राष्ट्रध्वज फडकावला आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त यंदाचा सोहळा विशेष आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi Ka Amtrut Mahotsav) देशभर साजरा होताना दिसत असून घरोघरी राष्ट्रध्वज फडकवला जातोय. किती संघर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, याची माहितीही नव्या पिढीला मिळणे अत्यंत गरजेचे आहे. अशा अनेक गोष्टी माहित असणं गरजेचं आहे ज्या आपल्या देशाशी निगडित आहेत. अनेक रंजक गोष्टी आहेत ज्याची माहिती आपल्याला असायलाच हवी. आज आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य दिनाबद्दल (Independence Day) अशा अनेक रंजक गोष्टी सांगत आहोत. चला जाणून घेऊया या दिवसाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे.

  • प्रश्न : गांधीजी 15 ऑगस्ट 1947 च्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभाचा भाग होते की नाही?

उत्तर : नाही, महात्मा गांधी या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.

  • प्रश्न : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किती रियासतांनी भारतात प्रवेश केला?

उत्तर: 560 रियासत

  • प्रश्न : भारताव्यतिरिक्त इतर कोणते देश 15 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्यदिन साजरा करतात?

उत्तर: कोरिया, कांगो, बहरीन आणि लिश्टेनस्टाइन

  • प्रश्न : जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधानपदाची शपथ कोणी दिली?

उत्तर: लॉर्ड माऊंटबॅटन

  • प्रश्न : जवाहरलाल नेहरूंनी आपलं ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ भाषण कधी आणि कुठे दिलं

उत्तर : 14 ऑगस्टच्या मध्यरात्री व्हाइसरॉय लॉजला (सध्याचे राष्ट्रपती भवन)

  • प्रश्न : 15 ऑगस्टला कोणत्या स्वातंत्र्यसैनिकाचा जन्म झाला?

उत्तर : महर्षी अरबिंदो घोष यांचा जन्म झाला.

  • प्रश्न : स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?

उत्तर: लॉर्ड माऊंटबॅटन

  • प्रश्न : गोवा भारताचा भाग कधी झाला?

उत्तर: 1961

  • प्रश्न : ‘जन गण मन’ हे भारताचे राष्ट्रगीत कधी झाले?

उत्तर- 24 जनवरी, 1950

  • प्रश्न : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषा कधी निश्चित झाली?

उत्तर: 15 अगस्त 1947

अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.