AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE Advanced 2021 : जेईई ॲडव्हान्सड परीक्षेचं वेळापत्रक जारी; ‘या’ तारखेपासून नोंदणीला सुरुवात

जेईई मेन्स परीक्षेचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता विद्यार्थी जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेची वाट पाहत आहेत. संयुक्त प्रवेश परीक्षा अ‌ॅडव्हान्सडसाठी नोंदणी 11 सप्टेंबर 2021 पासून सुरू होईल.

JEE Advanced 2021 : जेईई ॲडव्हान्सड परीक्षेचं वेळापत्रक जारी; 'या' तारखेपासून नोंदणीला सुरुवात
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 6:36 PM
Share

JEE Advanced 2021 नवी दिल्ली: जेईई मेन्स परीक्षेचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता विद्यार्थी जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेची वाट पाहत आहेत. संयुक्त प्रवेश परीक्षा अ‌ॅडव्हान्सडसाठी नोंदणी 11 सप्टेंबर 2021 पासून सुरू होईल. जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण असणारे विद्यार्थीनोंदणी करू शकतात. कोरोना विषाणू संसर्गामुळे या वर्षी जेईई मुख्य परीक्षा 2021 चार टप्प्यांत घेण्यात आली.

जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेची जबाबदारी आयआयटी खरगपूर

जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेची नोंदणी प्रक्रिया भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) खरगपूरद्वारे पूर्ण केली जाणार आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट- jeeadv.ac.in द्वारे अर्ज करू शकतात. जेईई मेन 2021 चा निकाल 10 सप्टेंबर 2021 पर्यंत जाहीर होईल, अशी शक्यता आहे

अडीच लाख विद्यार्थी सहभागी होण्याचा अंदाज

जेईई मेन 2021 परीक्षा उत्तीर्ण करणारे 2.5 लाख विद्यार्थी जेईई अ‌ॅडव्हान्सड 2021 परीक्षेसाठी पात्र असतील. देशातील आयआयटी संस्थातील प्रवेशासाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा 3 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. परीक्षेपासून निकालापर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

महत्वाच्या तारखा

नोंदणी प्रक्रिया सुरु : 11 सप्टेंबर 2021 नोंदणीची शेवटची तारीख : 16 सप्टेंबर 2021 प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख : 25 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2021 परीक्षेची तारीख : 3 ऑक्टोबर 2021

दोन सत्रात परीक्षा

जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली शिफ्ट पेपर एक साठी असेल जी सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत असेल. दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर दोन दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत घेण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित तपशीलांसाठी उमेदवार जेईई अ‌ॅडव्हान्सडच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

गेट परीक्षेची नोंदणी 2 सप्टेंबरपासून

अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या गेट 2022 परीक्षेची नोंदणी प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली आहे. अभियांत्रिकी पदवी परीक्षा (GATE) 2022 साठी नोंदणी gate.iitkgp.ac.in या वेबसाईटवर करण्यात येईल. विद्यार्थी आता गेट परीक्षेची नोंदणी 2 सप्टेंबरपासून करु शकतात. गेट परीक्षा जे विद्यार्थी देऊ इच्छितात ते आयआयटी खरगपूरच्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकतात.

आयआटी खरगपूरकडे गेट आयोजनाची जबाबदारी

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूरने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आता 2 सप्टेंबरपासून सुरू होईल. उमेदवारांनी गेट परीक्षेची अधिकृत नोटिफिकेशन वाचल्याशिवाय अर्ज करु नये, असं आवाहन करण्यात आलंय. गेट 2022 साठी नवीन वेबसाईटवर सविस्तर नोटिफिकेशन आयआयटी खरगपूरकडून जारी करण्यात आलं आहे. तसेच, GATE 2022 च्या परीक्षेची व्याप्ती वाढवण्यात आलीय. BDS आणि M. Pharm पदवी असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे.

इतर बातम्या:

GATE Exam 2022 : गेट परीक्षेची नोंदणी लांबणीवर, ‘या’ तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरु

FYJC Admission : अकरावीसाठी पहिल्या यादीतील प्रवेशनिश्चितीची अखेरची संधी, दुसऱ्या फेरीची आज घोषणा

JEE Advanced 2021 Registration to be Started from September 11 Exam Schedule released check here

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.