AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE Main 2025 : JEE मेन 2025 सत्र-2 साठी ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

JEE मेन 2025 सत्र 2 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी आहे. जाणून घेऊयात त्यासाठीची संपूर्ण प्रोसेस

JEE Main 2025 : JEE मेन 2025 सत्र-2 साठी ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
| Edited By: | Updated on: Feb 22, 2025 | 7:21 PM
Share

JEE Main 2025 Session 2 Apply : इंजिनीअर होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. JEE मेन 2025 सत्र 2 साठी अर्ज प्रक्रिया लवकरच संपणार आहे. या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी JEE मेन jeemain.nta.ac.in च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करावा.

इंजिनीअर होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही परीक्षा जागतिक दर्जाचे शिक्षण आणि उज्ज्वल करिअरचे प्रवेशद्वार आहे. यामाध्यमातून देशभरातील अव्वल दर्जाच्या संस्थांमध्ये BE/बीटेकमधील विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतले जातात.

प्रवेश कुठे मिळतो?

31 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) 26 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर (एसपीए) 37 सरकारी अनुदानित तांत्रिक संस्था (जीएफटीआय) 1 आयआयईएसटी, शिबपूर

इंजिनीअर होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी JEE मेन 2025 परीक्षेची पात्रता नेमकी काय आहे, याविषयी पुढे जाणून घेऊया.

JEE मेन 2025 पात्रता

मान्यताप्राप्त केंद्र/राज्य मंडळाद्वारे (CBSE, CIACE इ.) 10+2 प्रणालीची अंतिम परीक्षा मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठाद्वारे इंटरमीडिएट किंवा दोन वर्षांची पूर्व-विद्यापीठ परीक्षा नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीच्या दोन वर्षांच्या जॉइंट सर्व्हिसेस विंग कोर्सची अंतिम परीक्षा एनआयओएसद्वारे किमान पाच विषयांसह वरिष्ठ माध्यमिक शालांत परीक्षा भारत किंवा परदेशातील पब्लिक स्कूल / बोर्ड / विद्यापीठ परीक्षा, एआययूद्वारे 10 + 2 प्रणालीच्या समकक्ष म्हणून मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा एआयसीटीई किंवा राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून मान्यताप्राप्त तीन वर्षांचा डिप्लोमा जीसीई ए-लेव्हल परीक्षा (लंडन / केंब्रिज / श्रीलंका) केंब्रिज विद्यापीठाचे हायस्कूल प्रमाणपत्र किंवा आयबी ऑफिस, जिनिव्हा येथून आंतरराष्ट्रीय पदवी पदविका बारावीची समकक्ष परीक्षा भारताबाहेर एआययू समकक्षता प्रमाणपत्रासह उत्तीर्ण

JEE मेनसाठी वयोमर्यादा

JEE मेन 2025 परीक्षेला बसण्यासाठी वयाची अट नाही. 2023, 2024 मध्ये इयत्ता 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण किंवा 2025 मध्ये बोर्ड परीक्षा देणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

JEE मेन 2025 मध्ये किती जागा?

भारतातील एनआयटीमध्ये दरवर्षी सुमारे 24 हजार जागा उपलब्ध होतात. 2025 मध्ये ईशान्येकडील राज्यांमध्ये एनआयटीसाठी राज्य कोट्याअंतर्गत सुमारे 2,000 जागा राखीव राहण्याची शक्यता आहे. तसेच एनईयूटी प्रवर्गांतर्गत 740 जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत.

पुन्हा एकदा लक्षात घ्या की, JEE मेन 2025 परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी JEE मेन jeemain.nta.ac.in च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करावा.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.