JEE Main 2021 May Postponed : जेईई मेन मे सत्राची परीक्षा लांबणीवर, विद्यार्थ्यांच्या मागणीला यश

JEE Main 2021 May Postponed : जेईई मेन मे सत्राची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आलं आहे.

JEE Main 2021 May Postponed : जेईई मेन मे सत्राची परीक्षा लांबणीवर, विद्यार्थ्यांच्या मागणीला यश
जेईई मेन्सच्या अंतिम सत्राची परीक्षा 26 ऑगस्टपासून सुरू होणार
Yuvraj Jadhav

|

May 04, 2021 | 4:31 PM

JEE Main 2021 May Postponed नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)कडून जेईई मेन परीक्षा मे सत्राची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे नियोजित वेळापत्रकाप्रमाणं जेईई मेन 2021 एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. जेईई मेन परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं दिली आहे. (Jee Main Exam May 2021 postponed due to corona virus outbreak said by National Testing Agency)

एप्रिल सत्राची परीक्षा यापूर्वी स्थगित 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)कडून जेईई मेन परीक्षा एप्रिल सत्राची परीक्षा स्थगित करण्यात आली होती. नियोजित वेळापत्रकाप्रमाणं जेईई मेन 2021 एप्रिल सत्राची परीक्षा 27 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत घेण्यात येणार होती. जेईई मेन परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली होती.

परीक्षा लांबणीवर टाकण्याची विद्यार्थ्यांची मागणी

भारतात कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये 3 लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. वाढत्या कोरोना विषाणू संसर्गामुळे सीबीएसईच्या बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. देशातील इतर बोर्डांच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.जेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा 27 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान होणारी परीक्षा लांबणीवर टाकावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. जेईई मेनच्या विद्यार्थ्यांकडून #POSTPONEJEEMains2021 ही मोहिम राबवली गेली होती. परीक्षा लांबणीवर टाकून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे.

NEET PG परीक्षा लांबणीवर

वाढत्या कोरोना विषाणू संसर्गामुळे 18 एप्रिलला होणारी NEET PG परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आली होता.  केंद्र  सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नीट पीजी परीक्षा चार महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर, कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून गौरवण्यात येणार आहे.

नेट परीक्षा लांबणीवर

नॅशनल ईलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच राष्ट्रीय पात्रता परीक्षाही इतर परीक्षांप्रमाणे पुढे ढकलण्यात आली आहे.  2 मे ते17 मे दरम्यान नेटची परीक्षा होणार होती. दरवर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( एनटीए ) मार्फत सहायक प्राध्यापक पदासाठी परीक्षा घेतली जाते. मात्र, देशातला आणि राज्यातला वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ देऊन परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाईल.

संबंधित बातम्या: 

JEE Main 2021 April परीक्षा लांबणीवर टाका, विद्यार्थ्यांची POSTPONEJEEMains2021 हॅश्टॅगसह ट्विटरवर मोहीम

UGC NET 2021 Postpone : सीबीएसई, नीट पाठोपाठ नेटची परीक्षा लांबणीवर टाका, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मागणी

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें