AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE Main 2021 Result:दिल्लीच्या काव्या चोप्रानं रचला इतिहास, जेईई मेन मार्च सत्रात 300 पैकी 300 गुणांची कमाई

JEE Main 2021 March Result:जेईई मेन मार्च सत्रात 13 विद्यार्थ्यांनी 100 एनटीए गुण मिळवले त्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे.

JEE Main 2021 Result:दिल्लीच्या काव्या चोप्रानं रचला इतिहास, जेईई मेन मार्च सत्रात 300 पैकी 300 गुणांची कमाई
काव्या चोप्रा
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Mar 25, 2021 | 12:00 PM
Share

JEE Main 2021 March Result नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन मार्च परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. मार्च सत्रात 13 विद्यार्थ्यांनी 100 एनटीए मिळवले आहेत. या 13 विद्यार्थ्यांमध्ये 2 मुलींचा समावेश आहे. यामध्ये दिल्लीची काव्या चोप्रा (Kavya Chopra) आणि महाराष्ट्राची गार्गी मकरंद बक्षी (Bakshi Gargi Makarand) यांचा समावेश आहे. (JEE Main March 2021 result Kavya Chopra and Gargi Bakshi came in toppers list)

काव्या चोप्राला 300 पैकी 300 गुण

काव्या चोप्रानं केवळं 100 एनटीए गुण मिळवले नाहीत तर जेईई मेन 2021 परीक्षेत 300 पैकी गुण मिळवले आहेत. काव्या चोप्रानं फेब्रुवारीमध्ये देखील जेईई मेन परीक्षा दिली होती. त्यामध्ये तिला 99.9 परसेंटाइल मिळाले होते. काव्या IIT प्रवेश परीक्षा – JEE Advanced 2021 ची तयारी करत आहे. काव्याला फेब्रुवारी महिन्यातील परीक्षेत 99.9 परसेंटाइल गुणांवर जेईई अ‌ॅडवान्स परीक्षेत यश मिळवलं असतं पण त्यावर ती समाधानी नव्हती, असं तिनं सांगितलं आहे. काव्याला आईआईटी-दिल्ली आणि आईआईटी-बॉम्बेमध्ये कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश घ्यायचा आहे. 13 टॉपर्स मध्ये दिल्ली NCTमधील 2, तेलंगाना 3, राजस्थानातील 2 , महाराष्ट्रातील 2 , बिहारमधील 1, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. जेईई मेन परीक्षा 16 मार्च ते 18 मार्च दरम्यान घेण्यात आली. एकूण 6,19,368 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

100 एनटीए स्कोर मिळवणारे विद्यार्थी(JEE Main 2021 Toppers)

विद्यार्थ्याचं नावराज्य
काव्या चोप्रादिल्ली
सिद्धार्थ कालरादिल्ली
बन्नूरु रोहित कुमार रेड्डीतेलंगाणा
मदुर आदर्श रेड्डीतेलंगाणा
जोसयुला वेंकट आदित्यतेलंगाणा
ब्रतिन मंडलपश्चिम बंगाल
कुमार सत्यदर्शी बिहार
मृदुल अग्रवालराजस्थान
जेनिथ मल्होत्राराजस्थान
रोहित किमार राजस्थान
आश्विन अब्राहमतामिळनाडू
अथर्व अभिजीत तंबतमहाराष्ट्र
गार्गी मकरंद बक्षीमहाराष्ट्र

असा चेक करा निकाल

स्टेप 1: विद्यार्थ्यांनी निकाल तपासण्यासाठी jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जावे. स्टेप 2: वेबसाईटवर दिलेल्या जेईई मेन मार्चच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 3: आता नोंदणी क्रमांक आणि जन्मतारखेच्या मदतीने लॉग इन करा. स्टेप 4: आपला निकाल स्क्रिनवर दिसून येईल. स्टेप 5: निकाल तपासा आणि त्याची प्रिंट घ्या.

संबंधित बातम्या:

JEE Main 2021 March Result:जेईई मेन मार्च सत्रात महाराष्ट्रातील दोघांचा डंका, 100 एनटीए गुणांची कमाई

JEE Main March Result 2021: जेईई मुख्य परीक्षा मार्च सत्राचा निकाल जाहीर, jeemain.nta.nic.in वर पाहा निकाल

(JEE Main March 2021 result Kavya Chopra and Gargi Bakshi came in toppers list)

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा