AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ताप चढलाय, नाक वाहतंय, 2-4 दिवसांची सुटी द्या, शाळा बंद थोडी पडतेय? विद्यार्थ्याचा रजेचा अर्ज पाहिला?

आपल्या भावना अगदी मनापासून लिहिल्या की त्या किती भावतात, हेच या विद्यार्थ्याने दाखवून दिलंय.

ताप चढलाय, नाक वाहतंय, 2-4 दिवसांची सुटी द्या, शाळा बंद थोडी पडतेय? विद्यार्थ्याचा रजेचा अर्ज पाहिला?
Image Credit source: social media
| Updated on: Nov 09, 2022 | 12:24 PM
Share

नवी दिल्लीः रजेचा अर्ज (Leave Application) लिहायचा म्हटलं की अनेकांना घरच्यांची, मित्रांची मदत घ्यावी लागते. औपचारिक भाषा, औपचारिक कारणं वापरत कसा बसा अर्ज लिहिला जातो. पण जेव्हा रजेचा अर्ज अगदी मनापासून लिहिला असेल तर त्यातून लिहिणाऱ्याच्या भावना किती खऱ्या आहेत, हेही कळतं. सोशल मीडियावर व्हायरल होतोय असाच एक रजेचा अर्ज. तो लिहिलाय अस्सल बुंदेलखंडी भाषेत (Bundelkhand Language). एका IAS अधिकाऱ्याने (IAS Officer) तो शेअर केलाय. त्यावरून नेटकऱ्यांनी शाळेच्या दिवसांच्या आठवणी काढून प्रतिक्रियांचा पाऊसच पाडलाय.

आयएएस अधिकारी अर्पित वर्मा यांनी ट्विटरवर ही पोस्ट शेअर केली आहे. हा मजकूप छापीलच आहे. पण एका विद्यार्थ्याचा तो रजेचा अर्ज असल्याचं पोस्टमध्ये म्हटलंय.

ही पोस्ट खरी आहे, असं मानलं तर तो लिहिणारा विद्यार्थी बुंदेलखंडचा आहे. देशी भाषेतच खऱ्या भावना मांडून त्याने वाचकांची मनं जिंकली आहेत.

आपल्या भाषेत रजा मागताना त्याने लिहिलंय….. ‘तो मास्साब, ऐसो है कि दो दिना से चड रओ है जो बुखार… उपर से जा नाक बह रई सो अलग. जई के मारे हम सकूल नई आ पाहे सो तमाए पाऊ पर के निवेदन आए कि दो-चार दिना कि छुट्टी दे देते तो बडो अच्छा रहतो..

या अर्जाचा शेवट तर एवढा मजेशीर आहे की शिक्षकांना तो वाचून सैरावैरा पळावं वाटलं असेल…

त्याने लिहिलंय… भले ही मैं स्कूल आऊं या न आऊं, कौन सा स्कूल बंद हो जाएगा.. आपका कलुआ..’

IAS अधिकाऱ्याच्या या पोस्टवर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडतोय. हसणाऱ्या इमोजींचे भरपूर रिप्लाय आले. तर एका यूझरनं लिहिलंय… वाह जी वाह क्या गजब का पंच मारा है… तर दुसऱ्याने कलुआ तू खरच बोलतोयस… तुझ्या न येण्याने शाळा खरच बंद पडणार नाही… तर एकाने थोडी नाराजी दर्शवली… ‘इत्तो मजाक न उडाओ सर जी हमारे बुंदेलखंड को’ तर कुणी आपल्या भाषेच्या आठवणीने खुश झाले. जय बुंदेलखंडीचे नारे लगावलेत…

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.