AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Board SSC Result 2025: काही क्षणांत इयत्ता 10 वीचा निकाल, टीव्ही 9 वर पाहा सर्वांत आधी रिझल्ट, A टू Z माहिती एका क्लिकवर!

MSBSHSE Maharashtra Board 10th SSC Result : इयत्ता 12 वीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यरभारत इयत्ता 10 विच्या निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल येत्या 13 मे रोजी लागणार असल्याचे जाहीर केले आहे.

Maharashtra Board SSC Result 2025: काही क्षणांत इयत्ता 10 वीचा निकाल, टीव्ही 9 वर पाहा सर्वांत आधी रिझल्ट, A टू Z माहिती एका क्लिकवर!
MAHARASHTRA SSC 10th CLASS RESULT 2025
| Updated on: May 13, 2025 | 7:00 AM
Share

Maharashtra Board 10th Result 2025 : इयत्ता 12 वीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यरभारत इयत्ता 10 विच्या निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल येत्या 13 मे रोजी लागणार असल्याचे जाहीर केले आहे. दुपारी 1 वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी निकाल नेमका कुठे पाहावा? त्यासाठीची संकेतस्थळं कोणती? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

शिक्षण मंडळाने नेमकं काय सांगितलं?

मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 10 वीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी निकाल नेमका कुठे पाहावा?

1. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams

2. https://results.digilocker.gov.in

3. https://sscresult.mahahsscboard.in

4. http://sscresult.mkcl.org

वर उल्लेख केलेल्या संकेतस्थळांवर क्लिक करून विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका पहता येईल. आगामी शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांना ही गुणपत्रिका डाऊनलोडही करता येईल. तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

विद्यार्थ्यांनी निकाल कसा पाहावा?

विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या संकेतस्थळांपैकी कोणत्याही संकेतस्थळावर क्लिक करावे. त्यानंतर विद्यार्थ्याने आपला आसनक्रमांक तसेच विचारण्यात आलेली इतर माहिती व्यवस्थित भरावी. ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल दिसेल.

इयत्ता 10 वीचा निकाल मेल किंवा व्हॉट्सअपवर हवा असेल तर इथे नोंदणी करा…

पूनर्मुल्यांकन करायचे असल्यास काय करावे?

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी करता येईल. विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या https://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावरुन स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करता येईल. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवार, दिनांक 14/05/2025 ते बुधवार, दिनांक 28/05/2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्घतीने शुल्क Debit Card/ Credit Card/UPI/Net Banking याद्वारे भरता येईल.

Follow Us
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला