Maharashtra Board 12th Result 2025: रि-चेकींगचा फॉर्म भरायचा? जाणून घ्या कधीपर्यंत आणि कसा भरता येणार?

HSC Result 2025: महाराष्ट्र बोर्डाने नुकतंच पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या १२वीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. जर विद्यार्थांना रि-चेकींगचा फॉर्म भरायचा असेल तर त्याची मुदत कधीपर्यंत आहे चला जाणून घेऊया...

Maharashtra Board 12th Result 2025: रि-चेकींगचा फॉर्म भरायचा? जाणून घ्या कधीपर्यंत आणि कसा भरता येणार?
HSC Result
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 05, 2025 | 12:45 PM

Maharashtra Board 12th Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज, ५ मे रोजी जाहीर करण्यात आला आहे. मंडळाने निकालाची माहिती पत्रकार परिषदेतून जाहीर केली आहे. विद्यार्थांचा निकाल हा दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. बारावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थांना जर एखाद्या विषयाचा रि-चेकींगचा फॉर्म भरायचा असले तर त्याची मुदत आणि शुल्क किती असेल याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली आहे.

ज्या विद्यार्थांना रि-चेकींगचा फॉर्म भरायचा आहे त्याची मुदत ६ मे २०२५ म्हणजे उद्या पासून ते मंगळवार २० मे २०२५ पर्यंत देण्यात आली आहे. अधिकृत सकेंतस्थळावर जाऊन हा अर्ज भरता येणार आहे. प्रत्येक विषयासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच उत्तर पत्रिकेची फोटो कॉपी घेतल्याशिवाय विद्यार्थांना रि-चेकींगचा फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे उत्तराची फोटो कॉपी मिळवण्यासाठी विद्यार्थांना ६ मे ते २० मे या काळात अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर ही फोटो कॉपी विद्यार्थांना हस्तपोच किंवा ऑनलाइन किंवा रजिस्टार पद्धतीने देण्यात येणार आहे. एका विषयाच्या फोटोकॉपीसाठी ३०० रुपये आकारले जाणार आहेत. पुनरमुल्यांकनासाठी ३०० रुपये तर छाया पत्रिकेसाठी ४०० रुपये शुल्क ऑनलाइन पद्धतीने जमा करावे लागेल.
वाचा: इयत्ता 12 वीच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरू, ‘टीव्ही 9 मराठी’वर रिझल्ट कसा पाहायचा? जाणून घ्या

किती शुल्क आकारले जाणार?

रि-चेकींगचा फॉर्म भरण्यासाठी उत्तराची फोटोकॉपी घेणे गरजेचे आहे. या फोटो कॉपीसाठी प्रती विषय ३०० रुपये आणि छाया पत्रिकेसाठी ४०० रुपये एवढे मूल्य ऑनलाईन पद्धतीने भरुन घेण्यात येणार आहे. विविध स्पर्धा परीक्षा तसेच विविध प्रोफेशनल परीक्षा, प्रवेश पात्रता परीक्षा म्हणजेच जेई, नीट यासारख्या प्रवेश परीक्षा असतात त्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेची गुण पडताळणी आणि छाया प्रत तातडीने करुन देण्यात येण्याची सुचना सर्व विभागीय मंडळांना देण्यात आली आहे. त्यासाठी सदर परिक्षेच्या प्रवेश पत्राची प्रत विशेष शिक्षकांच्या अभिप्रायासोबत अपलोड करावी लागणार आहे.

मुलींनी मारली बाजी

यंदाही निकालात नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के आहे तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे. म्हणजे मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ५.०७ टक्के अधिक आहे. तसेच यंदा बारावीचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाला आहे. मागील वर्षापेक्षा यंदाचा निकाल १.४९ टक्क्यांनी कमी आहे. सन २०२२ या वर्षात ९४.२२ टक्के निकाल लागला होता. त्यानंतर २०२३ मध्ये ९१.२५ टक्के निकाल लागला होता. २०२४ मध्ये ९३.३७ टक्के निकाल लागला आहे. तसेच या वर्षी २०२५ मध्ये ९१.८८ टक्के निकाल लागला आहे. यंदा निकाल कमी का लागला त्यांचा आढवा घेण्यात येणार आहे.