Maharashtra Board 12th Result 2026 LIVE : बारावीचा निकाल काही तासांवर; जाणून घ्या निकालाबद्दल A टू Z माहिती एका क्लिकवर..
Maharashtra Board 12th Result 2026 LIVE Updates in Marathi : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा राज्यभरात घेण्यात आल्या. आज बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होईल. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पद्धतीने बघता येईल.

LIVE NEWS & UPDATES
-
बारावीची मार्कशीट या पद्धतीने करा डाऊनलोड..
बारावी परीक्षेचा आज निकाल आहे. ज्याकरिता तुम्ही दुपारी एकला ऑनलाइन पद्धतीने निकाल पाहू शकता. तिथे तुमचा रोल नंबर टाका आणि मागितलेली माहिती भरा. त्यानंतर सर्वात खाली तुम्हाल डाऊनलोडचे ऑप्शन येईल, त्यानंतर ती मार्कशीट डाऊनलोड करा.
-
बारावी निकालाबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर पूर्ण माहिती..
बारावी निकाल लागण्यासाठी काही तास शिल्लक आहेत. 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता निकाल लागणार आहे. विद्यार्थ्यांन हा निकाल ऑनलाईन पद्धतीने बघता येणार आहे..
-
-
Maharashtra Board HSC Result 2026 : बोर्डाची 11 वाजता पत्रकार परिषद..
12 वी परीक्षेचा निकाल आज लागणार आहे. 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद आहे. त्यामध्ये त्यांच्याकडून विभागनिहाय निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल.
-
Maharashtra Board HSC Result 2026 : बारावीच्या निकालात कोणता विभाग ठरणार अव्वल..
आज बारावी परीक्षेचा निकाल आहे. या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. दुपारी 1 वाजता निकाल विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने बघू शकणार आहेत. बारावी निकालात कायम कोकण विभाग अव्वल ठरतो. यंदा नक्की कोणता विभाग बाजी मारतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
-
बारावीचा निकाल कुठे पाहणार? जाणून घ्या..
बारावीचा निकाल तुम्ही www.tv9marathi.com आणि mahahsscboard.in आणि mahresult.nic.in वर पाहू शकता. तिथे तुम्हाला रोल नंबर आणि आवश्यक माहिती भरून निकाल पाहू शकतात. तसेच डिजीलॉकर आणि SMS द्वारेही निकाल पाहता येणार आहे.
-
-
Maharashtra Board HSC 12th Result : विद्यार्थी कुठे पाहू शकणार आहेत निकाल, जाणून घ्या..
बारावीचा निकाल दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने हा निकाल पाहू शकणार आहेत. tv9 मराठीच्या वेबसाईटवरही विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे.
-
Maharashtra Board HSC 12th Result Live : निकालात कोण मारणार बाजी
आज बारावीचा निकाल जाहीर होईल. या निकालात कोण बाजी मारणार हे पाहण्यासारखे ठरले. किती विद्यार्थ्यांनी शंभरी गाठली, याबाबत अकरा वाजता बोर्डाकडून माहिती दिली जाईल.
-
Maharashtra Board HSC 12th Result Live : बारावीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला
आज बारावीचा निकाल जाहीर होईल. दुपारी 1 वाजता विद्यार्थी निकाल ऑनलाईन पद्धतीने बघू शकणार आहेत. त्यापूर्वी बोर्डाची पत्रकार परिषद होईल. विद्यार्थ्यांमध्ये या निकालाबद्दल मोठी उत्सुकता बघायला मिळत आहे.
-
Maharashtra Board HSC 12th Result : कोण मारणार बाजी? मुले की मुली..
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होईल. काही वेळात निकालाचे अपडेट पुढे येतील. मात्र, यंदाच्या निकालात नक्की कोण बाजी मारणार यावरून चर्चा रंगत आहे. दरवर्षी निकालात मुलीच बाजी मारताना दिसतात.
बारावी अर्थात HSC परीक्षेचा निकाल आज 2 मे रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा राज्यभरात घेण्यात आल्या. त्या परीक्षेचा निकाल आज आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य ठरणार आहे. दुपारी 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेतली जाईल, ज्यामध्ये विभागनिहाय निकाल जाहीर होईल. संपूर्ण निकालाची टक्केवारी सांगितली जाईल. विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने बघता येईल. विद्यार्थी आपला निकाल ऑनलाईन तसेच इतर माध्यमांद्वारे सहज पाहू शकतात. www.tv9marathi.com वेबसाईटवरही विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल. यासोबतच mahahsscboard.in आणि mahresult.nic.in वर जाऊन आपला रोल नंबर आणि आवश्यक माहिती भरून निकाल पाहू शकतात. बारावी निकालाचे प्रत्येक अपडेट आपल्याला येथे tv9 च्या लाईव्ह ब्लॉगवरही बघायला मिळेल. निकालाचे प्रत्येक अपडेट आपल्याला इथे बघायला मिळेल.