AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra HSC Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर, तुमच्या जिल्ह्याचा निकाल किती?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांनी आपला निकाल दुपारी १ वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

Maharashtra HSC Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर, तुमच्या जिल्ह्याचा निकाल किती?
Hsc result 2026
| Updated on: May 02, 2026 | 12:47 PM
Share

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल आज शनिवारी २ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. या निकालाची उत्सुकता राज्यातील सुमारे १४ लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांचे निकाल एकाच वेळी ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. राज्याच्या नऊ विभागीय मंडळांचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. यातील तुमच्या विभागाचा निकाल किती लागला? याची माहिती आता समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतंच पत्रकार परिषद घेत इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. यंदा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. राज्याचा एकूण निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्डाकडून विभागीय निकालांचीही घोषणा करण्यात आली.दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने आपला दबदबा कायम राखत राज्याच्या निकालात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर लातूर विभागाची कामगिरी सर्वात कमी पाहायला मिळत आहे.

राज्यातील शैक्षणिक निकालांमध्ये कोकण विभागाचा एक वेगळाच दरारा पाहायला मिळतो. यंदाही कोकणच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विभागाला अव्वल स्थानी नेऊन ठेवले आहे. कोकणातील निकालाची परंपरा पाहता, ग्रामीण भाग असूनही येथील विद्यार्थ्यांनी शहरवासीयांना मागे टाकले आहे.

यंदाचा विभागनिहाय निकाल?

विभाग निकाल (टक्केवारी)
कोकण ९४.१४%
पुणे ९१.२५%
अमरावती ९०.९२%
नाशिक ९०.७२%
मुंबई ९०.०८%
कोल्हापूर ८९.९७%
छत्रपती संभाजीनगर ८८.६८%
नागपूर ८८.६७%
लातूर ८४.१४%

विद्यार्थ्यांनो निकाल कसा चेक कराल? पाहा स्टेप्स

  • सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाईटवर जा.
  • होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2026’ लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी तुमचा सीट क्रमांक टाका. तसेच सोबत आईचे नाव भरुन ‘सबमिट’ बटणवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • या निकालाची प्रत तुम्हाला डाऊनलोड करता येईल.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट कोणत्या?

1) https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th

2) https://results.digilocker.gov.in

3) https://mahahsscboard.in

4) http://hscresult.mkcl.org

आज बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदाचा इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी