AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओमिक्रॉनची भीती, 1 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार का? सरकार काय निर्णय घेणार?

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याच्या निर्णयाच काय होणार असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

ओमिक्रॉनची भीती, 1 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार का? सरकार काय निर्णय घेणार?
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Nov 28, 2021 | 11:46 AM
Share

मुंबई: महाराष्ट्र सरकारनं येत्या 1 डिसेंबरपासून पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याच्या निर्णयाच काय होणार असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. ठाकरे सरकारनं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असला तरी ओमिक्रॉन विषाणू ससंर्गाची भीती वाढल्यानं यासंदर्भात शालेय शिक्षण विभाग नेमका काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्याबाबत फेरविचार?

राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं पहिली ते चौथीचे वर्गा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, ओमिक्रॉन विषाणूमुळं निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवार हा निर्णय बदलला जाण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉनच्या संसर्गांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नवी नियमावली जाहीर केली आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णयाबाबत सोमवारी चर्चा होण्याची शक्यता आहे.

शासन निर्णय कधी जारी होणार

मंत्रिमंडळ बैठकीत शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासदंर्भात माहिती दिली होती. मात्र, शाळा सुरु करण्यासंबंधीचा शासन निर्णय जारी कधी होणार याकडे शाळांचं लक्ष लागलं आहे.

नियमावली काय असणार?

राज्य शासनानं शाळा सुरु करण्यासंबंधीचा निर्णय जाहीर केला असला तरी शाळा सुरु करताना कोरोना प्रतिबंधक नियमावली कशी असावी, कोणत्या नियमांचं पालन केलं जावं यासंदर्भात नियम किंवा मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत.

पालकांमध्ये संभ्रम

पहिलीपासूनच्या शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचं काही पालकांनी स्वागत केलं आहे. तर, काही पालकांनी या निर्णयाला विरोध देखील केला होता. ओमिक्रॉनच्या संसर्गामुळं पालकांचा शाळा सुरु करण्याला विरोध वाढण्याची शक्यता आहे. तर, शाळा सुरु करण्यासंदर्भात आदेश जारी करण्यात आलेले नसल्यानं सोमवारी आणि मंगळवारी राज्य सरकार आणि शालेय शिक्षण विभाग नेमका काय निर्णय घेणार याकडे पालकासंह विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.

इतर बातम्या:

FRAUD: बँकेत गहाण ठेवलेले 7 प्लॉट परस्पर विकले, औरंगाबादेत सेंट्रल बँक ऑफ इंडियाची अडीच कोटींची फसवणूक

सू्र्यासारखे तेजस्वी भविष्य प्राप्त करण्यासाठीचे सोपे उपाय, सूर्य देव नक्की प्रसन्न होणार

Maharashtra School Reopen from 1 December Omicron variant impact on decision

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...