महिंद्रा ग्रुपकडून परदेशात शिक्षणासाठी 4 लाखांची शिष्यवृत्ती, वाचा सविस्तर

कौशल्य विकसासाठी टेक महिंद्रा फाऊंडेशन द्वारे स्मार्ट अकॅडमी चालवली जाते. Mahindra Pride School Scholarship

महिंद्रा ग्रुपकडून परदेशात शिक्षणासाठी 4 लाखांची शिष्यवृत्ती, वाचा सविस्तर
महिंद्रा ग्रुप
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 6:54 PM

मुंबई: आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील अग्रगण्य ट्रॅक्टर कंपनी महिंद्रा कंपनीची जाहिरात देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. महिंद्रा कंपनीच्या जाहिरातीद्वारे महिलांची कणखर प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. महिंद्रा ही कंपनी देशातील महत्वाची कंपनी असून त्यांच्यातर्फे स्मार्टअकॅडमीतर्फे भारतात प्रशिक्षित आणि विविध कौशल्य विकासाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवले जातात. महिंद्रा कंपनी महिंद्रा प्राईड स्कूल देखील चालवली जातात. कौशल्य विकसासाठी टेक महिंद्रा फाऊंडेशन द्वारे स्मार्ट अकॅडमी चालवली जाते. के.सी. महिंद्रा स्कॉलरशीप अंतर्गत 4 लाख रुपये परदेशातील शिक्षणासाठी दिले जातात. (Mahindra Pride School gave 4 lakh rupees scholarship for education in abroad know details )

स्मार्ट अकॅडमी

स्मार्ट अकॅडमीकडून आरोग्य सेवेतील अभ्यासक्रम, डिजीटल टेक्नॉलॉजी कोर्सेस आणि लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन कोर्सेस यामधील अभ्यासक्रम चालवले जातात. आरोग्य सेवेतील विविध डिप्लोमा अभ्यासक्रमांचं शिक्षण दिलं जाते. डिजीटल टेक्नॉलॉजीमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवले जातात.

महिंद्रा प्राईड स्कूल

महिंद्रा उद्योगसमूहाकडून महिंद्रा प्राईड स्कूल चालवली जातात. देशभरातील चेन्नई, पुणे, पाटणा, चंदीगढ, हैदराबाद, वारणसी आणि श्रीनगर येथे प्राईड स्कूल सुरु आहेत. 18 ते 25 वर्ष वयोगटातील समाजातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी चालवली जातात. 2007 पासून आतापर्यंत 39 हजार विद्यार्थ्यांना महिंद्रा प्राईड स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर नोकरी मिळाली आहे.

के.सी. महिंद्रा स्कॉलरशीप

ही स्कॉलरशीप पदव्युत्तर शिक्षण परदेशात घ्यायचे असेल त्यांच्यासाठी राबवण्यात येते. पहिल्या तीन टॉप विद्यार्थ्यांना 8 लाख तर इतर विद्यार्थ्यांना 4 लाख रुपयांची स्कॉलरशिप दिली जाते. अर्ज करणाऱ्यांनी पदवी किंवा पदविका परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावे. 31 मार्च 2021 पर्यंत अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी https://www.kcmet.org/what-we-do-Scholarship-Grants.aspx या वेबसाईट माहिती वाचून अर्ज सादर करावेत.

संबंधित बातम्या

भारतातील सर्वात मोठ्या कोव्हिड सेंटरमध्ये आता परदेशी रुग्णांवर उपचार; वाचा नेमकं काय घडलं?

पुण्यातील खासगी इंग्रजी शाळांचे ऑनलाईन शिक्षण बंद!

(Mahindra Pride School gave 4 lakh rupees scholarship for education in abroad know details )

Non Stop LIVE Update
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.