भारतातील टॉप-10 इंजिनिअरिंग कॉलेज, प्रवेश मिळाला तर करोडोचं पॅकेज मिळालंच समजा!
अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेकांचा गोंधळ होत असतो. त्याचपार्श्वभूमीवर देशातील टॉप-10 अभियांत्रिकी महाविद्यालयांची माहिती जाणून घ्या...

मुंबई : खरंतर चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालक प्रयत्न करीत असतात. यामध्ये जर अभियांत्रिकी मध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी JEE Advanced ही परीक्षा देण्यापासून ते कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळायला हवा याबाबत माहिती घेतली जाते. तशी लगबग सध्या सुरू देखील आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास देशातील आयआयटी महाविद्यायलात प्रवेश दिला जातो. सध्या जेईईची मुख्य परीक्षा सुरू आहे. त्याचा अखेरचा टप्पा हा 15 एप्रिलला संपणार आहे. जवळपास अडीच लाख विद्यार्थी यासाठी आपले नशीब आजमावत असून त्यापैकी एक लाख विद्यार्थ्यांना आयआयटी प्रवेशची संधी मिळणार असून इतरांना एनआयटी आणि केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता येतो. त्यापैकी टॉप-10 कॉलेजची माहिती जाणून घेऊया.
1) आयआयटी मद्रास चेन्नई मध्ये असलेले आयआयटी मद्रास 2022 मध्ये एनआयआरएफ च्या रँकिंगमध्ये भारतात प्रथम क्रमांकावर होते. येथे सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल आणि इतर विषयात बीटेक करता येते. याशिवाय जेईई अॅडव्हान्स परीक्षेत मध्ये 30 हजारांहून अधिक रँक मिळवणाऱ्यांनाच येथे प्रवेश मिळतो.
2) आयआयटी मुंबई देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या यादीत आयआयटी मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. बीटेक सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्ससह इतर विषयात अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांना दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे पॅकेज मिळते. त्यामुळे प्रवेशासाठी नेहमीच आग्रह धरला जातो.
3) आयआयटी खरगपूर खरगपूर येथील आयआयटीचा देशात तिसऱ्या स्थानी आहे. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या संधी उपलब्ध होतात. याशिवाय विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील समुपदेशनाचे धडे दिले जातात.
4) आयआयटी दिल्ली आयआयटी दिल्ली दक्षिण दिल्ली येथे स्थित आहे. त्याचा परिसर अनेक एकरांमध्ये पसरलेला आहे. संपूर्ण भारतात काही हजार रँक मिळवणाऱ्या उमेदवारांनाच त्यात प्रवेश दिला जातो. यासाठी उमेदवारांना जेईईच्या समुपदेशनात हजर राहावे लागेल.
5) आयआयटी रुरकी आयआयटी रुरकी हे उत्तराखंड मध्ये आहे. देशातील सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये हे पाचव्या स्थानी आहेत. आयआयटी रुरकीत सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकलमध्ये बी.टेक हे अभ्यासक्रम आहेत. याबद्दल अधिकची माहिती ही विद्यार्थ्यांना जेईईच्या समुदेशनाच्या दरम्यान ही उपलब्ध करून दिली जाते.
6) आयआयटी हैदराबाद आयआयटी हैदराबाद हे तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहरात मध्ये आहे. शेकडो एकर परिसरात हे महाविद्यालय असून मोठा परिसरात आहे. यामध्ये देशातील सर्वोत्तम शिक्षण येथे दिल्याचा दावा केला जातो. आयआयटी हैदराबाद सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक. हे अभ्यासक्रम आहेत.
7) आयआयटी गांधीनगर आयआयटी गांधीनगर हे गुजरातमधील गांधीनगर येथे आहे. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या बहुतेक उमेदवारांसाठी हा टॉप पर्याय असतो. आयआयटी गांधीनगर मध्ये विविध विषयात बी.टेकचे विषय आहे. शेकडो एकर मध्ये हा संपूर्ण कॉलेज परिसर आहे.
8) आयआयटी रोपर भारतात आयआयटी रोपर आठव्या स्थानी आहे. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेत चांगली रँक मिळणाऱ्या विद्यार्थ्यांनाच इथे संधी दिली जाते. या संस्थेत अधिक श्रीमंत असलेल्या घरातील मुले प्रवेश घेतात. येथे टीईडी मध्ये बीटेक करता येते.
9) आयआयटी पटणा भारतातील नवव्या स्थानावर असलेल्या आयआयटी पटणाचा क्रमांक लागतो. सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकीच्या यादीत पटणाचे महत्वाचे स्थान आहे. विविध विषयात इथे बीटेक करता येते. त्यामुळे देशातील अनेक विद्यार्थी इथे प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न करीत असतात.
10) आयआयटी गुवाहाटी आयआयटी गुवाहाटी हे देशातील दहाव्या स्थानावर असलेले अभियांत्रिकी महाविद्यालय असून शेकडो एकर जागेत महाविद्यालयाचा परिसर आहे. एनआयआरएफ च्या रांगेत दहाव्या स्थानावर होते. येथे प्रवेश मिळावा यासाठी अनेक विद्यार्थी शर्तीचे प्रयत्न करीत असतात. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेत चांगली रँक मिळणाऱ्या विद्यार्थ्यांनाच येथे प्रवेश मिळतो.
