AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NAS Survey 2021: संपूर्ण देशभरात नॅशनल ॲचिव्हमेंट सर्वेक्षण, 38 लाख विद्यार्थी सहभागी होणार

देशभरातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीनं नॅशनल ॲचिव्हमेंट सर्वे घेण्यात येत आहे. आज हा सर्वे होणार आहे.

NAS Survey 2021: संपूर्ण देशभरात नॅशनल ॲचिव्हमेंट सर्वेक्षण, 38 लाख विद्यार्थी सहभागी होणार
नॅस
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 7:09 AM
Share

नवी दिल्ली: देशभरातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीनं नॅशनल ॲचिव्हमेंट सर्वे घेण्यात येत आहे. आज हा सर्वे होणार आहे. नॅस अंतर्गत देशभरातील तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला जातो. यावर्षी हा सर्वे देशभरातील 36 राज्यातील 733 जिल्ह्यातील 1.23 लाख शाळांमध्ये होणार आहे. तर,यामध्ये एकूण 38 लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

कोरोना विषाणू संसर्गामुळं सर्वेक्षण लांबणीवर

नॅशनल ॲचिव्हमेंट सर्वेक्षण दर तीन वर्षांनी करण्यात येते. यापूर्वीचा सर्वे 2017 मध्ये करण्यात आला होता. 2020 मध्ये नियोजित वेळेप्रमाणं सर्वेक्षण होणं आवश्यक होतं. मात्र, कोरोना विषाणू संसर्गामुळं सर्वेक्षण लांबणीवर पडलं होतं. अखेर नॅशनल अॅचिव्हमेंट सर्वेक्षण आज होत आहे.

सर्वेक्षण नेमकं कसं असणार?

देशभरातील 36 राज्यातील 1.23 लाख शाळांचा समावेश हा नॅस सर्वेक्षणात असेल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण विभागाच्यावतीनं देण्यात आली आहे. नॅस सर्वेक्षणात तिसरी आणि पाचवीच्या वर्गासाठी भाषा विषय, गणित आणि पर्यावरण यासंबंधी विद्यार्थ्यांचं ज्ञान तपासलं जाईल. भाषा विषय, गणित, सामाजिक शास्त्र आणि विज्ञान विषयाची चाचणी आठवीच्या वर्गासाठी घेतली जाईल. तर दहावीच्या वर्गासाठी भाषा विषय, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि इंग्रजी विषयातील विद्यार्थ्यांची प्रगती तपासली जाईल.

22 माध्यमांमध्ये चाचणी

नॅशनल अ‌ॅचिव्हमेंट सर्वेक्षण हे एकूण 22 माध्यमांमध्ये करण्यात येईल. आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मनिपुरी, मराठी, मिझो, ओडिया, पंजाबी, तामीळ, तेलुगू, उर्दू, बोडो, गारो, खासी, कोंकणी, नेपाळी, भुतिया, लेपचा या भाषांच्या माध्यमामध्ये ही चाचणी घेतली जाईल.

नॅस सर्वेक्षणाचा उद्देश

नॅशनल अ‌ॅचिव्हमेंट सर्वेक्षणाद्वारे विद्यार्थ्याना अध्ययन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी समजून घेणे. विद्यार्थ्यांच्या अडचणीवर समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. नॅसमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, सरकारी अनुदान प्राप्त आणि विनाअनुदानीत शाळा यां सहभागी होणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार पूर्वोत्तर भारतातील तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील या नॅसमध्ये समावेश असणार आहे.

इतर बातम्या:

National Education Day 2021: मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीला राष्ट्रीय शिक्षण दिन का साजरा होतो? वाचा सविस्तर

‘वाहतुकीची सोय करा, कोरोना नियम पाळा,’ NAS सर्वेक्षणासाठी 12 नोव्हेंबरला शाळा सुरु ठेवण्याचे आदेश

National Achievement Survey 2021 more than 38 lakh students participate in NAS which is conducted today

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.