AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता फक्त बीएडचं शिक्षण देता येणार नाही, देशभरातील कॉलेजांना धक्का; NCTEचा सर्वात मोठा आदेश काय?

सध्या देशात 15 हजारांहून अधिक बी.एडची कॉलेजेस चालू आहेत. यापैकी बहुतेक महाविद्यालये फक्त बी.एडची पदवी देतात. अशा महाविद्यालयांबाबत एनसीटीईने एक मोठा निर्णय घेतला आहे. काय आहे तो निर्णय ?

आता फक्त बीएडचं शिक्षण देता येणार नाही, देशभरातील कॉलेजांना धक्का; NCTEचा सर्वात मोठा आदेश काय?
NCTEचा सर्वात मोठा आदेश काय ?Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: May 26, 2025 | 11:40 AM
Share

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (NCTE) एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता देशात फक्त बी.एड महाविद्यालयांचं संचलन बंद होणार आहे. एनसीटीईने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, देशातील एकल-चालित बी.एड महाविद्यालये आता बहु-विषयक पदवी (डिग्री) कॉलेजेसमध्ये विलीन केली जातील. म्हणजे कोणतेही महाविद्यालय फक्त बी.एड. ची सिंगल पदवी देऊ शकणार नाही.

पक्त बी.एडची डिग्री देणारी कॉलेजेस होणार मर्ज

NCTEने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, बी.एड. ची सिंगल डिग्री(पदवी) देणारी कॉलेजेस म्हणजेच फक्त बी.एड. पदवीला आता बहुविद्याशाखीय अर्थात अनेक विषयांमध्ये पदवी देणाऱ्या महाविद्यालयांमध्ये विलीन व्हावे लागेल. NCTEच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, कोणत्याही पदवी महाविद्यालयात विलीन झाल्यानंतर, बी.एड महाविद्यालये इतर विषयांचे शिक्षण देखील सुरू करू शकतात आणि ते प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 50 विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतात.

15 हजार बीएड कॉलेजेसना दिलासा

NCTEने जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्त्वांमुळे देशातील 15 हजारांहून अधिक बी.एड महाविद्यालयांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, प्रत्यक्षात पहायला गेलं तर प्रवेशाअभावी ही बी.एड महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.अशा परिस्थितीत,आता एनसीटीईच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, फक्त बी.एड पदवी देणाऱ्या महाविद्यालयांना पदवी महाविद्यालयांच्या सहकार्याने काम करावे लागेल. यामुळे ते इतर विषयही शिकवू शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढेल.

2030 पर्यंतचं टार्गेट

NCTE ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये, सिंगल अर्थात फक्त बी.एड पदवी देणाऱ्या महाविद्यालयांना बहुविद्याशाखीय महाविद्यालयांमध्ये म्हणजेच पदवी महाविद्यालयांमध्ये सामील होण्यासाठी 2030 पर्यंत टार्गेट देण्यात आले आहे. ज्याअंतर्गत, यूजीसी 2030 पर्यंत अशा सर्व महाविद्यालयांना फक्त बी.एड पदवी देता येऊ शकणार नाही. त्यांना पदवी महाविद्यालयांशी जोडलं जावंच लागेल.

आता 12वी नंतर बीएड करण्याची संधी

आता देशात बी.एड प्रोग्राममधील प्रवेशाचे निकष बदलले आहेत. ज्याअंतर्गत आता विद्यार्थी बारावीनंतर बी.एड करू शकतात. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना बीए बी.एड, बी.कॉम बी.एड, बी.एससी बी.एड सारख्या पदव्या दिल्या जाणार आहेत. एकंदरीत, बी.एड.च्या अभ्यासक्रमात मोठा बदल झाला आहे. अशा परिस्थितीत, फक्त बी.एड. ची पदवी देणाऱ्या कॉलेजेसवर बंदीचे संकट घोंगावत होतं, मात्र त्यामुळेच आता एनसीटीईने बी.एड.ची प्रणाली बदलण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे बीएडची कॉलेजेस आता डिग्री कॉलेजेसह इतर कोर्सेसही सुरू करू शकतात आणि विद्यार्थ्यांना चार वर्षांची बी.एड पदवी सहज मिळू शकेल.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.